धक्कादायक! Samsung च्या मोबाईलचा भीषण स्फोट

मोबाईल खूप जास्त गरम झाला म्हणून जमिनीवर फेकला आणि क्षणात स्फोट झाला.

Updated: Jan 22, 2021, 05:26 PM IST
धक्कादायक! Samsung च्या मोबाईलचा भीषण स्फोट title=

वाशिम : मोबाईलचा स्फोट होत असल्याच्या अनेक घटना आपण ऐकत असतो. मात्र आता चक्क एका नामांकित कंपनीच्या मोबाईल फोनचा स्फोट झाल्यानं मोठी खऴबळ उडाली आहे. या घटनेमुळे वाशिम हादरलं आहे. वाशिम जिल्ह्यात सॅमसंग मोबाईलचा स्फोट झाला. लोणी गावच्या प्रदीप बोडखे यांचा हा मोबाईल असल्याची माहिती मिळाली आहे. या स्फोटात मोबाईलची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. 
प्रदीप बोडखेंनी डिसेंबर 2020 मध्ये F 41 सॅमसंग मोबाईल फ्लिपकार्टवरुन विकत घेतला होता. जवळपास 20 दिवस मोबाईल चांगला चालला. प्रदीप आज मोबाईलवर बोलत असताना अचानक मोबाईल गरम झाला.

मोबाईल इतका तापला की त्यांनी तो जमिनीवर फेकला. जमिनीवर पडल्या-पडल्या मोबाईलचा स्फोटा झाला . दैव बलवत्त म्हणून प्रदीप यांनी योग्य वेळी मोबाईल फेकला नाहीतर त्यांच्या हाताला आणि कानाला इजा झाली असती. मात्र सॅमसंग सारख्या नामांकित कंपनीचा मोबाईलचा अचानक स्फोट झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.