मातीनं भरलेलं शरीर आणि ओली नाळ...दाम्पत्याने का फेकलं जिवंत अर्भक

वर्ध्यातील कारंजा घाडगे तालुक्यातून एक दुदैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे.

Updated: Jun 9, 2022, 02:12 PM IST
मातीनं भरलेलं शरीर आणि ओली नाळ...दाम्पत्याने का फेकलं जिवंत अर्भक   title=

मिलींद आंडे, झी मीडिया, वर्धा : वर्ध्यातील कारंजा घाडगे तालुक्यातून एक दुदैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे.नवजात बालकाचे जिवंत अर्भक कचऱ्यात फेकल्याची घटना समोर आली आहे.  बाळाच्या रडण्याच्या आवाजाने ही घटना समोर आली आहे. अर्भकाला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नवजात बाळाला कचऱ्यात फेकणाऱ्या निर्दयी आई-वडिलांचा शोध घेतला जात आहे.  

बोंदरठाणा येथे गावशेजारी नवजात बालकाचे जिवंत अर्भक कचऱ्यात फेकल्याची खळबळजनक घटना घडलीय.मातीने भरलेलं त्याच शरीर आणि ओली नाळ अशा अवस्थेत हे जिवंत अर्भक आढळलं. मध्यरात्री 2 दोन वाजता बाळाचा रडण्याचा आवाज आल्याने ही घटना उघडकीस आली.

गजाम यांच्या घराशेजारी महिलेला रडण्याचा आवाज आला असता, त्यांनी आपल्या कुटुंबासह पाहणी केली असता त्यांना धक्काच बसला. तासाभरापूर्वी जन्माला आलेलं जिवंत बाळ कचऱ्यात फेकल्याचे आढळले.याबाबत गावातील आशा सेविका व अंगणवाडी सेविकेला माहिती दिली.

घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता अर्भकाचे पूर्ण शरीर मातीने भरलेलं दिसून आले.पहाटेच्या थंड हवेत बाळाचे शरीर थंड झाले होते. याबाबत पोलिसांना माहिती देत तातडीने अर्भकाला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.बाळाची प्रकृती बिघडली असल्याने त्याला पावडर दूध पाजण्यात आले.मात्र पावडर दूध पित नसल्याने नवजात बाळाला वर्धा येथे रेफर करण्यात आले.बाळाला वाचवण्यासाठी आशा सेविका, अंगणवाडी सेविका ,डॉक्टर ,पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहे.सध्या बाळाला वर्धा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. 

पुरुष जातीचे नवजात बाळ फेकून देणाऱ्या निर्दयी आई-वडिलांना काही वाटलं नाही का? पोटच्या बाळाला फेकून दिल्याने मनाला चटका देणारी घटना घडलीय. निर्दयी आई-वडिलांचा पोलिसांकडून शोध सुरु असून आहे. तर या दाम्पत्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी,असा संताप नागरीक व्यक्त करत आहेत.