औरंगाबाद : राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackarey ) यांची काल औरंगाबाद ( Aurangabad ) येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या ( Marthvada Sanskrutik Mandal ) मैदानावर सभा झाली. 8 जून 1985 मध्ये शिवसेनेची मराठवाड्यातील पहिली शाखा सुरु झाली. याच शाखेच्या वर्धापन दिनानिमित्ताने उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. मात्र, या सभेला एक गालबोट लागलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही स्वाभिमान सभा संपली. त्यानंतर त्यांच्या गाडीचा ताफा निघाला. सभा संपल्यावर मुख्यमंत्री विमानतळाकडे निघाले. यावेळी त्यांच्यापाठोपाठ अनेक शिवसैनिक सुद्धा भरधाव वेगाने गाड्या घेऊन निघाले.
औरंगाबादच्या एपीआय कॉर्नर येथे हा गाड्यांचा ताफा आला. याचवेळी एक शिवसैनिकाच्या भरधाव गाडीने रस्त्यावरून जाणाऱ्या एका मोपेड गाडीला उडवले. यात दुचाकीचा तोल जाऊन त्यावर असणारी चार वर्षाची चिमुकली दूर फेकली गेली.
ती चिमुकली दूर फेकली गेली पण त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या एका कारखाली ती आली. काही वेळाने त्या चिमुकलीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिकांनी कार थांबवून चालकाला आणि आतील लोकांना पकडले.
संतप्त लोकांनी कार चालक आणि आतील लोकांना मारहाण करत पोलिसांच्या स्वाधीन केले. हे सर्व उस्मानाबाद येथील शिवसेनेचे पदाधिकारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.