राज ठाकरे यांच्या भाषणाबाबत पोलिसांची वेट अ‍ॅण्ड वॉच भूमिका, तात्काळ अटक नाही!

Raj Thackeray has no immediate arrest : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाबाबत पोलिसांची वेट अ‍ॅण्ड वॉच भूमिका घेतली आहे. 

Updated: May 4, 2022, 08:56 AM IST
राज ठाकरे यांच्या भाषणाबाबत पोलिसांची वेट अ‍ॅण्ड वॉच भूमिका, तात्काळ अटक नाही! title=

मुंबई : Raj Thackeray has no immediate arrest : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाबाबत पोलिसांची वेट अ‍ॅण्ड वॉच भूमिका घेतली आहे. तातडीने कोणालाही अटक करण्याची गरज नसल्याची पोलिसांची माहिती आहे. पोलिसांकडून भाषणाबाबत तपास सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे दरम्यान, प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी कारवाई राज ठाकरेंवर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबाद पोलीस राज ठाकरे यांना चौकशी नोटीस देणार आहेत.

राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी त्यांच्यावर तात्काळ अटकेसारखी कुठलीही कारवाई होणार नाही, वरिष्ठ पोलिसांनी ही माहिती दिलीय, चौकशी करणं, नोटीस देणं हे जरी सुरू असलं तरी अटकेसारखी कारवाई इतक्यात होणार नाही. तर पोलीसही वेट अ‍ॅण्ड वॉचची (wait and watch) भूमिका घेत आहेत. राज ठाकरे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. मात्र लावलेली कलमं जामीनपात्र आहेत. या संदर्भात तपास सुरु आहे. मात्र तातडीने अटक करण्याची गरज नाही असं पोलिसांनी म्हटलंय. औरंगाबाद पोलिसांनी प्रक्षोभक भाषणप्रकरणी राज ठाकरे आणि आयोजक राजीव जावळीकर यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर औरंगाबादेतल्या सभेतील भाषणप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर चिथावणीखोर भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून अनेक कलमं लावण्यात आली आहेत. औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये राज ठाकरे यांना आरोपी नंबर एक करण्यात आले आहे. या एफआयआरची प्रत 'झी 24 तास'च्या हाती लागली आहे.

राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई कशी झाली, याबाबत नवीन माहिती हाती आली आहे.. त्यानुसार तब्बल 5 तास पोलिसांनी राज ठाकरे यांचं सुमारे 45 मिनिटांचं भाषण ऐकलं. राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेत अटी आणि शर्तींचं उल्लंघन झालंय का, हे तपासण्यासाठी पोलीस उपायुक्त अपर्णा गितेंनी सायबर शाखेत तब्बल 5 वेळा काळजीपूर्वक हे भाषण ऐकले, तसेच त्यांनी गृह खात्याला अहवाल पाठवून दिला. त्यानंतर राज ठाकरेंवर कारवाईचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्र्यांचा भाऊ असल्यामुळेच जामीनपात्र कलमं लावल्याची आरोप एमआएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय. राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्याचं स्वागत करतानाच खूप साधी कलमं लावल्याबद्दल MIM खासदार इम्पियाज जलील यांनी नाराजी व्यक्त केलीये.