मीरा भाईंदर : मीरा भाईंदर महापालिकेच्या 95 जागांसाठी शांततेत मतदान पार पडलं. साडेपाच वाजेपर्यंत 45 टक्के मतदान झालं आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.
निवडणूक सुरळीत पार पडावी म्हणून 9 निवडणूक अधिकारी नेमण्यात आले होते. या निवडणुकीत सगळ्याच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. कारण सर्वच पक्षांनी ही निवडणूक स्वबळावर लढवलीय. मात्र खरी लढाई ही शिवसेना आणि भाजपमध्ये आहे. आता मतदारराजा कोणाला कौल देतो हे सोमवारी निकालानंतर स्पष्ट होईल.
दरम्यान मीरा भाईंदर निवडणुकीत अनेक मतदारसंघामध्ये मतदार याद्यांमधील घोळ समोर येत आहे. त्यामुळे कित्येकांना मतदान केंद्रावरून मत न देता परत यावं लागतंय. काही ठिकाणी अनेक वर्षापासून मतदान करणा-या लोकांची नावं मतदार यादीतून गायब झालीत. त्यामुळे अनेक उमेदवारांचे धाबे दणाणलेलत.
महापालिका निवडणुकीच्या निकालावर याचा परिणाम होणार असल्याची भीती उमेदवारांना सतावत आहे. तर मतदान हक्क बजावता न आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.