चंद्रकांतदादांना शरद पवारांची कोपरखळी

भाजप प्रवेशाबाबत भाजपचे नेते तथा चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिपद सोडण्याची तयारी दाखवली आहे. 

Updated: Aug 20, 2017, 07:41 PM IST
चंद्रकांतदादांना शरद पवारांची कोपरखळी title=

कोल्हापूर : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नारायण राणे यांना मंत्रिपदाची ऑफर देणारा, तसेच विधानसभेत निवडून येण्याची चिंता असणारा नेता, मंत्रिमंडळात बरेच निर्णय घेताना दिसतोय, अशी कोपरखळी शरद पवारांनी चंद्रकांतदादा पाटील यांना लगावली आहे.

यापूर्वी काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत भाजपचे नेते तथा चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिपद सोडण्याची तयारी दाखवली आहे. 

पक्षाचा आवश्यकतेपोटी जर माझे बांधकाम खातं त्यांना द्यावं लागलं तरी मी तयार आहे,  नारायण राणे यांनी पक्षामध्ये यावं याचं आम्ही स्वागत करतो,  असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे, यावर शरद पवारांनी हा चंद्रकांतदादांना टोला हाणला आहे.