Gautami Patil : फेमस होण्यासाठी तुम्ही उठताय... घनश्याम दराडेचे गौतमी पाटीलला हात जोडून आवाहान

Ghanshyam Darade on Gautami Patil : डान्सर गौतमी पाटीलने तिच्या अदांनी महाराष्ट्रातल्या तरुणाईला अक्षरक्षः वेड लावलं आहे. मात्र नृत्यावरुन गौतमीला सातत्याने टिकेला सामोरे जावे लागत आहे. अशातच घनश्याम दराडे यानेही गौतमी पाटीलवर निशाणा साधला आहे

आकाश नेटके | Updated: May 15, 2023, 09:47 AM IST
Gautami Patil : फेमस होण्यासाठी तुम्ही उठताय... घनश्याम दराडेचे गौतमी पाटीलला हात जोडून आवाहान  title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : सध्या राज्यात विविध गावांमध्ये जत्रा सुरु असून या जत्रेच्या कार्यक्रमात लावणी कलाकार गौतमी पाटील (Gautami Patil) हे प्रमुख आकर्षण ठरत आहे. गौतमीच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी होताना  पाहायला मिळत आहे. गौतमी पाटीलच्या लावणीच्या (Lavni) कार्यक्रमाबद्दल अनेक लावणी कलाकारांनी आक्षेप देखील घेतलेला आहे. अशातच आता राज्यात छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या घनश्याम दराडेने (Ghanshyam Darade) गौतमी पाटीलच्या नृत्यावर आक्षेप घेत तिला महाराष्ट्राचा बिहार करु नका असे आवाहन केले आहे.

गौतमी ताईंना कळकळीची विनंती आहे.की महाराष्ट्राची संस्कृती मोडू नका. लावणीला लावणी सारखं राहू द्या. कलेला कलेप्रमानेच सादर केलं पाहिजे असे छोटा पुढारी धनश्याम दराडे म्हणाला आहे. धनश्याम दराडे याचा मुसंडी हा चित्रपट 9 जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. त्याच्या प्रमोशनसाठी घनश्याम दराडे पुण्यात आला होता. त्यावेळी माध्यमांसोबत संवाद साधताना त्याने याबाबत भाष्य केले आहे. एमपीएससी आणि यूपीएससी करणाऱ्या मुलांच्या आयुष्यावर मुसंडी हा चित्रपट आहे.

काय म्हणाला घनश्याम दराडे?

"गौतमी ताईंना नम्रतेची विनंती करतो की लावणी महाराष्ट्राची संस्कृती असून तुम्ही ती चांगल्या प्रकारे करताय. पण तिला दुसरीकडे नेऊ नका. कला कलेच्या जागेवर राहू द्या. फेमस होण्यासाठी तुम्ही उठताय, सुटताय. चुकीचे कृत्य करु नका. फेमस व्हा पण तुमच्या कलेतून व्हा. महाराष्ट्राचा बिहार करु नका. जो महाराष्ट्राच बिहार करेल त्याच्या चुकीला माफी नसणार आहे. सगळ्या तरुणांना मी हात पाय जोडून सांगतो राजे बाई नाचवणारे नव्हते तर बाई वाचवणारे होते. संस्कृतीला तडा जाता कामा नये. वेगळ्या पद्धतीची लावणी तुम्ही ठेऊ नका. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांचा जीव जातोय. पोलिसांचे नाहक हाल होत आहेत. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने लावणी करु नका," असे आवाहन घनश्याम दराडेने केले आहे.

मध्यतंरी एसटी बसचालकाने गौतमीच्या कार्यक्रमासाठी सुट्टीचा अर्ज केल्याची बातमी व्हायरल झाली होती. त्याबाबतही घनश्याम दराडेने प्रतिक्रिया दिली आहे. "नाही बरोबर आहे. गावचा कार्यक्रम असला तर एन्जॉय केला पाहिजे. याच्यावर आपण काही बोलू शकत नाही. वैयक्तिक प्रश्न आहे. आता मी काही बोललो तर कर्मचारी म्हणतील आमच्या पगारावर का बोलत नाही," असेही घनश्याम दराडे म्हणाला.

शिंदे गटाने मुसंडी मारली देखील मुसंडी मारली

"स्पर्धा परीक्षा देताना उमेदवारांना अनेक अडचणी येतात. एक दोन मार्कांनी गेले की आत्महत्या करतात. त्याला एकच पर्याय आहे. 9 जून रोजी आमचा मुसंडी चित्रपट येत आहे. ज्याला कुणाला आयुष्यात मुसंडी मारायची आहे त्याने हा चित्रपट पाहावा. खास स्पर्धा परिक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी हा चित्रपट केला आहे. या चित्रपटात अनेक कलाकार आहे. आमचा चित्रपट पाहिल्यानंतर अपयश आलेले यशाकडे जाण्याचे स्वप्न बघणार आहेत. काल परवा शिंदे गटाने मुसंडी मारली. ज्याने त्याने आपल्या क्षेत्रात मुसंडी मारायला हवी," असे आवाहन घनश्याम दराडेने केले आहे.

दादा योग्यवेळी योग्यच मुसंडी मारणार

"या राजकारण्यांकडे बघूच वाटत नाहीये. सकाळ होईपर्यंत एखादा राजकारणी पक्ष बदलू शकतो. यांना कुणाचेही घेणे देणे पडले नाही. कुणाच्या खुर्चीखाली किती अंधार आहे हे माहिती नाही. सरकार कुणाचे आहे याचा मेळच बसत नाहीये. फक्त दोन खुर्च्या बदलल्या आहेत. सरकार केंद्रातल्या रिमोटने चालत आहे. त्या रिमोटचा सर्वसामान्य जनतेला त्रास होत आहे. अजित दादा योग्यवेळी योग्यच मुसंडी मारणार आहेत," असा दावा घनश्याम दराडेने केला आहे.