राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्याताई चव्हाण यांची निवड

Vidyatai Chavan elected as NCP's women Maharashtra President :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला (Women wing) प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

Updated: May 5, 2022, 01:34 PM IST
 राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्याताई चव्हाण यांची निवड  title=

मुंबई : Vidyatai Chavan elected as NCP's women Maharashtra President : रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर अनेक दिवस रिक्त असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला (Women wing) प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्याताई चव्हाण यांची निवड करण्यात आल्याची घोषणा राष्ट्रीय अध्यक्षा खासदार फौजिया खान यांनी केली आहे. 

विभागीय अध्यक्ष पद पहिल्यांदाच देण्याचा निर्णय

विद्याताई चव्हाण यांची निवड केल्याची घोषणा राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा खासदार फौजिया खान यांनी पत्रकार परिषदेत आज जाहीर केली. सध्या राज्यातील जिल्हा कमिट्या तशाच राहणार आहेत.  मात्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विभागीय अध्यक्ष पद पहिल्यांदाच देण्याचा निर्णय झाल्याचे फौजिया खान यांनी सांगितले.

यावेळी नागपूर विभाग अध्यक्षा शाहीन हकीम (गडचिरोली), अमरावती विभाग अध्यक्षा वर्षा निकम (यवतमाळ), मराठवाडा विभाग अध्यक्षा शाजिया शैख (जालना), वैशाली मोटे (उस्मानाबाद), पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्षा कविता म्हेत्रे (सातारा), वैशाली नागवडे (पुणे), कोकण विभाग अध्यक्षा अर्चना घारे (सिंधुदुर्ग), ठाणे विभाग अध्यक्षा ऋता आव्हाड (ठाणे), उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्षा कविता परदेशी आदींची नियुक्तीही खासदार फौजिया खान यांनी जाहीर केली.

विद्याताई चव्हाण यांना दिले नियुक्तीपत्र  

विद्याताई चव्हाण यांनी ही नियुक्ती स्विकारत असल्याचे सांगतानाच महागाईसारख्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाला आहे. महिला वर्ग त्रासाला आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधणार असल्याचे स्पष्ट केले. अनेक महिला पक्षात चांगले काम करत आहेत. मला पक्षाने संधी दिली आहे आणि जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला पात्र ठरेन असे सांगतानाच माध्यमाकडून सहकार्य मिळावे, अशी अपेक्षाही विद्याताई चव्हाण यांनी व्यक्त केली.