दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीची मतं कशी आणि कोणाला द्यायची? आमदारांना ट्रेनिंग, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मास्टर प्लान

CM Eknath Shinde : शिवसेनेच्या सर्व आमदारांना विधान परीषद निवडणुकीत कसं मतदान करायचं.. पहिल्या, दूसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीची मतं कशी द्यांयची याची माहीती  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना दिल्याचे समजते.  

वनिता कांबळे | Updated: Jul 10, 2024, 06:10 PM IST
दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीची मतं कशी आणि कोणाला द्यायची? आमदारांना ट्रेनिंग, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मास्टर प्लान title=
उद्धव ठाकरे सरकारविरुद्ध बंडखोरी केल्यानंतर आपल्या आमदारांसोबत बसलेले एकनाथ शिंदे यांचा जून 2022 चा फोटो

 Vidhan Parishad Election 2024 :   12 जुलैला विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यानं ही निवडणूक अधिक  चुरशीची झाली आहे.  विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या सर्व 9 उमेदवारांना निवडून आणण्याची सूत्रे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

विधान परीषद निवडणुकीत महाविकास आघाडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दे धक्का देण्याच्या तयारीत आहेत. यासाठी त्यांनी मास्टर प्लान तयार केल्याची माहिती मिळतेय. महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी करण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला पहिल्या पसंतीचे निर्णायक मत, त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीची मतं कशी आणि कोणाला द्यायची...? याची सांख्यिकी रणनिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरवलीय अशी माहिती सूत्रांनी दिली.

शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षासह सर्व घटक पक्ष आणि समर्थक अपक्ष आमदारांची एकत्र मोट बांधली महायुतीमधील शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षासह सर्व घटक पक्ष आणि समर्थक अपक्ष आमदारांची एकत्र मोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांधली.

महायुतीमधील तीन प्रमुख पक्षांच्या अंतर्गत बैठका पार पडल्यानंतर सर्व मतदार आमदारांचे विजयी गणित मांडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक चाली रचल्या आहेत. वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहीती नुसार महायुतीमधील पक्ष, घटक पक्ष आणि समर्थक अपक्ष आमदारांशी स्व:ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपर्क ठेवून आहेत.

महायुतीचे सर्व 9 उेमदवार विजयी करण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला पहिल्या पसंतीचे निर्णायक मतं  त्यानंतर दुसऱ्या आणि तीसऱ्या पसंतीची मतं कशी आणि कोणाला द्यायची याची सांख्यिकी रणनिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरवली आहे.
पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि योगेश टिळेकर हे भाजपचे उमेदवार आहेत. कृपाल तुमाने, भावना गवळी हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत. 

शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे  उमेदवार आहेत. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव,  शिवसेना ठाकरे गटाचे  मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे  जयंत पाटील हे महाविकासआघाडीचे उमेदवार आहेत.  संख्याबळाचा विचार केला तर महाविकास आघाडीचे 69 आमदार आहेत. त्यांचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. मात्र, मविआनं तीन उमेदवार दिल्यानं निवडणुकीत रंगत आली आहे. 

हे देखील वाचा....

मोठी राजकीय घडामोड, महाराष्ट्रात तिसरी आघाडी उभी राहणार, चार राजकीय पक्ष एकत्र येणार

आमदारांचा मुक्काम फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये; पुढच्या 48 तासांत महाराष्ट्राच्या राजकारणात काही घडू शकतं