VIDEO : पराभवानंतर 'दादां'ची तर विजयानंतर 'भाऊं'ची पहिली प्रतिक्रिया

सुरेश जैन यांना धोबीपछाड देत गिरीश महाजन यांना जळगाव महापालिकेवर विजय खेचून आणला

Updated: Aug 3, 2018, 03:59 PM IST
VIDEO : पराभवानंतर 'दादां'ची तर विजयानंतर 'भाऊं'ची पहिली प्रतिक्रिया title=

जळगाव : जळगाव : लोकांनी आमचा विकासाचा प्लान नाकारला आणि भाजपचा विकासाचा प्लान स्वीकारला, ही वस्तुस्थिती आहे, अशी प्रतिक्रिया सुरेशदादा जैन यांनी दिलीय. लोकांनी का नाकारलं? आम्ही कुठे कमी पडलो? याचं विचारमंथन आम्ही बसून करून... गेले ४० वर्ष लोकांनी आमच्यावर विश्वास टाकला... त्यानंतर त्यांना कुठेतरी परिवर्तन व्हावं असं वाटत असेल म्हणूनही त्यांनी नाकारलं असावं, असंही त्यांनी म्हटलंय. 

इथे पाहा व्हिडिओ

जळगाव निवडणुकीतले सर्व कल हाती आलेत. महापालिकेवर भाजपची सत्ता आली. भाजपला तब्बल ५७ जागांवर विजय मिळालाय. एकूण ७५ जागांपैकी ५७ जागा मिळाल्यानं भाजपनं जवळपास चार दशकं जळगावच्या राजकारणात दबदबा असणारे सुरेश जैन यांना जळगावकरांनी सपशेल नाकारलंय. दुसऱ्या स्थानी शिवसेनेनेला १५ जागा मिळाल्यात... तर एमआयएमला ३ जागांवर विजय मिळालाय.

दरम्यान, सुरेश जैन यांना धोबीपछाड देत गिरीश महाजन यांना जळगाव महापालिकेवर हा विजय खेचून आणला. जळगावकरांनी विकासाच्या राजकारणाला पाठिंबा दिलाय, त्यामुळेच आम्हाला स्पष्ट बहुमत मिळालंय... आम्ही दिलेल्या शब्दाला आम्ही बांधिल आहोत, अशी प्रतिक्रिया विजयानंतर महाजन यांनी दिलीय. 

इथे पाहा व्हिडिओ