व्हिडिओ : दिसेल त्याला धडका देणाऱ्या गाईला असं केलं जेरबंद

गाय काही केल्या कर्मचाऱ्यांच्या तावडीत सापडत नव्हती

Updated: Jul 21, 2018, 02:46 PM IST

चंद्रपूर : एक थरारक बातमी चंद्रपुरातून... शहरातल्या भानापेठ परिसरात एका गाईने हल्ला करून अनेक लोकांना जखमी केलंय. भानापेठ वॉर्ड परिसरात ही मोकाट गाय सकाळी दिसेल त्याला धडक देत सुटली... गाईच्या या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले. त्यातल्या सात जणांना गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या.

या बिथरलेल्या गाईबद्दल महापालिकेला कळवल्यानंतर महापालिकेचे कर्मचारी भानापेठमध्ये दाखल झाले. मात्र ही गाय काही केल्या कर्मचाऱ्यांच्या तावडीत सापडत नव्हती. 

अखेर मनपा कर्मचाऱ्यांनी मोठ्या हिमतीने दोरीचा सापळा तयार केला आणि या गाईला जेरबंद केलं. पण यामध्ये महापालिकेचे कर्मचारीही जखमी झाले.