मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांचे दर गडगडले

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांचे दर गडगडले आहेत. मात्र दर कमी होण्यासाठी वाढलेली आवक हे कारण असलं तरी आणखी एक अजब कारण आहे.  काय आहे हे दुसरं कारण पाहा हा रिपोर्ट

Updated: Nov 24, 2017, 10:53 PM IST
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांचे दर गडगडले title=

स्वाती नाईक, नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांचे दर गडगडले आहेत. मात्र दर कमी होण्यासाठी वाढलेली आवक हे कारण असलं तरी आणखी एक अजब कारण आहे.  काय आहे हे दुसरं कारण पाहा हा रिपोर्ट

भाज्यांची आवक वाढली

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक वाढलीय. आवक वाढल्यामुळे दर घसरणे ही झाली सर्वसामान्य बाब. पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे. आवक वाढलीय पण भाज्यांना उठावच नाही अशी परिस्थिती आहे.

 फेरीवाले मार्केटमध्ये फिरकलेच नाही

आणि याला कारण आहे मुंबईत फेरीवाल्यांवर सुरू असलेली कारवाई. रस्त्यावर बसून भाजीपाला विक्री करणारे ग्राहक गेला आठवडाभर मार्केटमध्ये फिरकलेच नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाठवलेली भाजी पडून आहे. नंतर ही भाजी फेकून द्यावी लागत आहे. 

कांद्याचा तुटवडा

कांद्याचा तुटवडा भासत असल्याने कांद्याचे दर 50 रुपये किलोवर गेलेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या तीन दिवसांपासून कांद्याचे भाव वाढलेत. नवीन कांदा 40 ते 45 रुपये किलो असून, जुना कांदा हा 42 ते 50 रुपये किलोवर गेलाय.  

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये परराज्यातून येणाऱ्या भाज्यांची आवक वाढलीय. यात दोडका, काकडी, दुधी या भाज्या गुजरातमधून येत आहेत. महाराष्ट्रातून वांगी, शेवगा, गवार, टोमॅटो येत आहेत. 

भाज्यांचे दर

मटार- 40 ते 45-  किलो
कोबी- 10 15
वांगी -10 12
सिमला -20 त 22
दुधी- 5 ते 6 
कारली -20 त 24
काकडी- 3 ते 4 
दोडके -20 ते24
फरसबी- 32 ते 34
फ्लॉवर -8 ते 10 
टोमॅटो- 36 ते 40 
शेवगा -80 ते 85 
भेंडी - 30 तर 32
गाजर -30 ते 28 

पालेभाज्या-

मेथी- 10 
कोथींबीर - 10 
कांदा पात- 10 रुपये 
पालक -7 ते 7 
शेपू -10 ते 15 

मुंबईत रस्त्यात बसून भाजीपाला विकणाऱ्या फेरीवाल्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली गेली. त्यामुळे रस्ते मोकळे झालेले दिसत आहेत. मात्र याचा परिणाम म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीला उठावच नाहीसा झालाय. त्याचा परिणाम भाज्यांचे दर कोसळण्यावर झालाय.