हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी परवानगी न मिळाल्याने उद्धव ठाकरेंचा शिवनेरी किल्ल्याचा दौरा रद्द

उद्धव ठाकरेंचा शिवनेरी दौरा रद्द झाला आहे. हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी परवानगी न मिळाल्याने दौरा रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Updated: Jan 20, 2024, 11:04 PM IST
हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी परवानगी न मिळाल्याने उद्धव ठाकरेंचा शिवनेरी किल्ल्याचा  दौरा रद्द title=

Uddhav Thackeray :  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नियोजित शिवनेरी दौरा रद्द झाला आहे. हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी परवानगी न मिळाल्याने उद्धव ठाकरे यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. शिवनेरा दौरा झाला असला तरी ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याची जोरदार तयारी सुरु आहे. 

रविवारी 21 जानेवारीला उद्धव ठाकरे, पत्नी रश्‍मी ठाकरे, शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे आणि पदाधिकारी शिवनेरी दौऱ्यावर जाणार होते. शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती श्री शिवाजीमहाराजांच्या जन्मस्थळी उद्धव ठाकरे भेट देणार होते. मात्र, हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी परवानगी न मिळाल्याने शिवनेरी दौरा रद्द झाला आहे. 

नाशिकमध्ये होणा-या ठाकरे गटाच्या विराट अधिवेशनावरुन संजय राऊत आणि नितेश राणेंमध्ये जुंपली

नाशिकमध्ये होणा-या ठाकरे गटाच्या अधिवेशनावरुन संजय राऊत आणि नितेश राणेंमध्ये जुंपलीय. नाशिकमध्ये शिवसेनेचं विराट अधिवेशन आणि सभा होईल.. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग नाशिकमधून  फुंकणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. तर 22 आणि 23 जानेवारीला होणारं ठाकरे गटाचं अधिवेशन म्हणजे श्रद्धांजली सभा असल्याची टीका नितेश राणेंनी केली. 

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे जाणार नाही

अयोध्येत होणा-या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे जाणार नाहीत. तर उद्धव ठाकरे 22 जानेवारीला नाशिकच्या दौ-यासाठी निघतील. अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी उद्धव ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिरात आरती करणार आहेत.. तर त्यानंतर ते गोदा घाटावर महाआरती करतील.. 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिवशी उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. 

ठाकरे गटात मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश 

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज भाजप पदाधिकारी, संघ परिवारातील पदाधिकारी आणि उत्तर भारतीयांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलाय...हिंदुत्त्वासाठी संघर्ष करणारे त्यावेळी वेगळे होते...मात्र, आता लाभ घेणारे वेगळे आहेत अशी टीका त्यांनी केली. बाळासाहेबांनी वाचवलं तेच लोक शिवसेना संपवायला निघालेत असा आरोपही त्यांनी केला.