नाही, नाही, नाही... व्हायरल ऑडिओ क्लीप ऐकवत भर सभेत उद्धव ठाकरे यांनी केली देवेंद्र फडणवीस यांची पोलखोल

फडणवीस नागपूरला लागलेला कलंक आहे असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.  नागपुरातील सभेत ऐकवली फडणवीसांची ऑडिओ क्लिप.'भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजपा पक्ष वाढवावा'... 'होऊन जाऊ दे चर्चा'... अशी ठाकरेंची नवी मोहीम आहे. 

Updated: Jul 10, 2023, 07:14 PM IST
नाही, नाही, नाही... व्हायरल ऑडिओ क्लीप ऐकवत भर सभेत उद्धव ठाकरे यांनी केली देवेंद्र फडणवीस यांची पोलखोल   title=

Uddhav Thackeray On Devendra Fadnavis : अजित पवार यांचा एक मोठा गट शिंदे-भाजपसोबत सत्तेत सहभागी झाला आहे. राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यामुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) असे दोन गट राष्ट्रवादीत पडले आहेत. भाजपने थेट राष्ट्रवादीसह सोबत केल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची एक ऑडिओ क्लीप व्हायरल होत आहे.  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भर सभेत  ऑडिओ क्लीप ऐकवत देवेंद्र फडणवीस यांची जाहीर पोलखोल केली आहे. 

सहनही होत नाही आणि सांगताही येत अशी देवेंद्र फडणवीस यांची अवस्था

सहनही होत नाही आणि सांगताही येत अशी देवेंद्र फडणवीस यांची अवस्था आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांची व्हायरल ऑडिओ क्लीप ऐकवली. या ऑडिओ क्लिपमध्ये देवेंद्र फडणवीस कधीही राष्ट्रवादी तसेच अजित पवार यांच्यासह युती करणार नाही असे अनेकदा नाही, नाही म्हणून ठणकावून सांगत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे नाही म्हणजे होत असतं.  नवे विकास पुरुष झालेत. त्यांचा स्वत:चा विकास होतोय. देवेंद्र फडणवीस यांच्या  गावठी कट्ट्यावर पैसे दिले जातात. 

भ्रष्टाराचारे आरोप करण्याचे आणि मग सत्तेत घ्यायचे

इतर पक्षातील गद्दार घेऊन भाजप आपली ताकद वाढत आहेत. इतरांची घर फोडून भाजप भ्रष्टाचाऱ्यांना भाजप सदाचारी बनवत आहे. भ्रष्टाराचारे आरोप करण्याचे आणि मग सत्तेत घ्यायचे अशी भाजपची कृती आहे. भगव्या झेंड्याच्या ताटातूट केली ही हिंदूत्वाशी गद्दारी आहे. धुनष्यबाणाबाबत संभ्रम निर्माण करुन धनुष्यबाण गद्दारांना दिला.  

फोटो बोलत नाही

बाळासाहेबांचा फोटो लावला म्हणजे बाळासाहेब सोबत आहेत अस होत नाही. बाळासाहेबांच्या विचाराने चालणारे शिवसैनिक माझ्या सोबत आहेत.   एकनाथ शिंदे यांना फोडून सरकार मजबूत केले होते ना? मग राष्ट्रवादी पक्ष का फोडला. भ्रष्ट जनता पार्टी असे भाजपचे नाव ठेवा.  आम्ही युती तोडली नाही. 2014 साली हिंदुत्वाची कुऱ्हाड भाजपने मारली. भाजपचे हिंदूत्व RSS ला मान्य आहे का? मोहन भागवत मशिदींमध्ये जातात. मन की बात उर्दूमध्ये दाखवणार. हे चालतं. पण, शिवसेना भाजपसोबत गेलेले यांना चालत नाही.