नवी दिल्ली : श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडेंच्या विरोधात बोलणाऱ्यांची लायकी आहे का ? असा खणखणीत सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे.
भीमा कोरेगावप्रकरणी संभाजी भिडे यांना दोषी ठरविले जात आहे. यावेळी उदयनराजे यांनी त्यांना पाठिंबा दर्शविला आहे.
संभाजी भिडेंविरोधात बोलून लोक दोन समाजात तेढ निर्माण करताहेत, असे ही ते म्हणाले.
भीमाकोरेगाव प्रकरणावरही यावेळी उदयनराजे बोलत होते. घडलेला प्रकार हा दुर्देवी आहे. १ जानेवारीला नक्की काय झाल नक्की कुणाला माहीत नाही.
पण त्यानंतर जे झालं ते पाहण्यापेक्षा माझे तुकडे झालेले बरे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.