गुन्हे दाखल होताच दोन्ही राजे गृहमंत्र्यांच्या भेटीला; देवेंद्र फडणवीस मिटवणार वाद?

Satara News : बुधवारी पुणे बंगळूर महामार्गावर साताऱ्यातील खिंडवाडी गावच्या हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन जागेचे भूमिपूजन करण्यावरून खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले समर्थकांसह समोरासमोर आल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.

आकाश नेटके | Updated: Jun 22, 2023, 10:21 AM IST
गुन्हे दाखल होताच दोन्ही राजे गृहमंत्र्यांच्या भेटीला; देवेंद्र फडणवीस मिटवणार वाद? title=

Udayanraje Bhosale vs Shivendra Raje Bhosale : साताऱ्यात (Satara News) खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांच्यात बुधवारी पुन्हा एकदा जोरदार वाद झाल्याचे पाहायला मिळालं आहे. साताऱ्याच्या खिंदवाडी गावात हा सगळा राडा झाला. यामुळे साताऱ्यात वातावरणं तापलं आहे. एका जमिनीच्या तुकड्यावरून झालेल्या वादानंतर दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद झाला. त्यानंतर पोलिसांना मध्यस्थी करून हा वाद मिटवला. मात्र एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या राड्यानंतर खिंदवाडी गावात मोठा तणाव निर्माण झाला होता. यावेळी उदयनराजे समर्थकांनी आक्रमक होतं साहित्याची मोडतोड केली. तसेच तिथे आणलेला एक कंटेनर देखील उलटून टाकला. याप्रकरणी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या सर्व वादानांतर कराड येथे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. कराड इथे देवेंद्र फडणवीस मुक्कामी असलेल्या ठिकाणी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांनी भेट घेतली आहे. या भेटीनंतर तिघांचीही एकत्र बैठक सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या भेटीत दोन्ही राजांमधील वादावर चर्चा होणार का याकडे लक्ष्य लागलं आहे.

नेमकं काय झालं?

बुधवारी सकाळी खिंदवाडी गावात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन जागेचा भूमिपूजन होणार होतं. मात्र त्याआधीच तिथे पोहचत खासदार उदयनराजे भोसले यांनी कार्यक्रम उधळून लावला आणि तिथे आणलेलं साहित्य फेकून दिलं. तर कंटेनर उलटा करुन टाकला. यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. मात्र त्यानंतरही शिवेंद्रसिंहराजे यांनी भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकला. त्यानंतर पुन्हा एकदा वाद पेटला. यावेळी पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि वादावर पडदा टाकला