छत्रपती उदयनराजे यांच्याकडून मुस्लीम समाजाची माफी

माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कराडमध्ये आयोजित मुस्लीम समाजाच्या मेळाव्यात मुस्लीम समाजाची जाहीर माफी मागितली.

Updated: Nov 15, 2019, 08:06 AM IST
छत्रपती उदयनराजे यांच्याकडून मुस्लीम समाजाची माफी title=

मुंबई : माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कराडमध्ये आयोजित मुस्लीम समाजाच्या मेळाव्यात मुस्लीम समाजाची जाहीर माफी मागितली. लोकसभा पोटनिवडणूक प्रचारादरम्यान कराडमधल्या सांगता सभेत, भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी जातीयवादी भाषण केल्याचं सांगत, उदयनराजे यांनी माफी मागितली.

उदयनराजेंना कराड दक्षिण आणि कराड उत्तर मधून खूप कमी मतदान झालं होतं. त्यात मुस्लीम समाजाकडून कमी मतदान होण्याला, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर यांचं ते भाषण कारणीभूत ठरल्याचं उदयनराजे म्हणाले.

उदयनराजे हे सातारा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून निवडून आले होते. पण उदयनराजे यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. यानंतर सातारा लोकसभेची पोटनिवडूक विधानसभा निवडणुकीसोबत घेण्यात आली. 

सातारा लोकसभा पोटनिवडणूक उदयनराजे भाजपाच्या तिकिटावर लढले, त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने श्रीनिवास पाटील यांना रिंगणात उतरवलं. अखेर श्रीनिवास पाटील हे सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत विजयी झाले.