प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : नदीला आलेल्या नव्या पाण्याची पूजा करण्याची परंपरा कोल्हापूरकर गेल्या अनेक वर्षापासुन जपतायत. आज शहरातील नागरीक आणि पेठातील तालीम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वाजत गाजत आणि पी ढबाक वाद्याच्या गजरात नव्या पाण्याचे स्वागत केलं. आजच्या दिवशी त्र्यंबोली देवीची यात्रा असते... आजही हे नवं पाणी देवीला आणि घरातील देवांना वाहिलं जाण्याची परंपरा अखंड पणे सुरु आहे.
नदीला आलेल्या नव्या पाण्याची पूजा करण्याची परंपरा कोल्हापूरकर गेल्या अनेक वर्षांपासून जपतायत... शहरातले नागरिक आणि पेठातल्या तालीम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अशी वाजतगाजत आणि पी ढबाक वाद्याच्या गजरात नव्या पाण्याचं स्वागत केलंय. आषाढ महिन्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी त्र्यंबोली देवीची यात्रा असते... आज हे नवं पाणी देवीला आणि घरातल्या देवांना वाहिलं जाण्याची परंपरा अखंडपणे सुरू आहे.
कोल्हापूरच्या महिलांसाठी तर एक मोठा उत्सवच असतो... या यात्रेच्या निमित्तानं महिला एकत्र येतात आणि त्यानंतर नवं पाणी घेवून सर्वजण हे पाणी नेवून त्र्यंबोली देवीच्या चरणावर अर्पण करतात...
ही गेल्या अनेक वर्षांची परंपरा म्हणजे कोल्हापूरच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा भागच म्हणावा लागेल.