Shocking : डोळ्यादेखत लेकीचा जीव गेला... काय वाटलं असेल त्या माऊलीला? एक क्षणात होत्याचं नव्हत झालं

Shocking : आजीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते गावी आले होते.  मोठ्या आनंदात त्यांनी वाढदिवस साजरा केला. पण, एका क्षणात हसता खेळता माहौल दुखा:त बदलला. 

Updated: Apr 11, 2023, 08:53 PM IST
Shocking : डोळ्यादेखत लेकीचा जीव गेला... काय वाटलं असेल त्या माऊलीला? एक क्षणात होत्याचं नव्हत झालं title=

प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : मृत्यू कोणाला कुठे कसं गाठेल याचा काही नेम नाही अशीच एक धक्कादायक घटना रत्नागिरीत (Ratnagiri) घडली आहे. डोळ्यादेखत लेकीचा जीव गेला आहे. नदीवर फिरण्यासाठी गेलेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. यात एक मुलगा आणि मुलीचा समावेश आहे. मृत मुलांचे कुटुंबिय मुंबईत राहणारे असून ते वाढदिवसानिमित्ताने ते गावी आले होते. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे (Shocking).  

घोसाळकर आणि तांबळे या दोन कुटुंबातील 15 आणि 14  वर्षे वयोगटातील दोघा अल्पवयीन मुला-मुलीचा भांबेड येथील मुचकुंदी नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  मंगळवारी 11 एप्रिल रोजी दुपारी 2.30  सुमारास यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लांजा तालुक्यातील गोविळ बौद्धवाडी येथील रहिवासी असलेले आणि सध्या विरार ईस्ट येथे राहणाऱ्या संगीता तुकाराम पवार ही महीला आपल्या मुली मयुरी कमलेश घोसाळकर (वय 15) तसेच  प्रतीक्षा कमलेश घोसाळकर (वय 12) यांच्यासह गावी आल्या होत्या. त्यांच्यासोबत मुंबईतील वरळी नाका येथे राहणारे सुशील गुंडाप्पा तांबळे (वय 14) आणि तन्मय गुंडाप्पा तांबळे ( वय 10) हे देखील आले होते. 

संगीता पवार यांची आई वनिता तुकाराम पवार( वय 66) यांचा 10 एप्रिल रोजी वाढदिवस असल्याने त्या 9 एप्रिल रोजी इको कारने मुंबईहून गावी गोविळ बौध्दवाडी येथे आले होते.  मंगळवारी 11 एप्रिल रोजी दुपारी जेवण आटोपून हे सर्वजण मुचकुंदी नदीवर भांबेड येथे  फिरण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्यासोबत वनिता पवार तसेच इको कार चालक रुपेश कोंडीभाऊ कंदारे असे एकूण सातजण नदीवर गेले होते.

यावेळी नदीपात्रात आंघोळ करण्यासाठी प्रथम मयुरी घोसाळकर हिने नदीत उडी मारली. मात्र, नदी पात्राचा आणि नदीतील मोठ्या कोंडीचा( कातळकडा) अंदाज न आल्याने ती पाण्यात गटांगळा खाऊ लागली. त्यामुळे घाबरलेल्या स्थितीत मयुरी हिने आपल्या आईला हाका मारल्या. तीचा आरडाओरडा ऐकून सुशील तांबळे याने या नदीपात्रात उडी मारली. मात्र, या दोघांच्या दुर्दैवाने ही दोघेही या नदीपात्रात बुडाली आणि त्यांचा या नदीपात्रातील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.