दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा तयार करणारे दोघे ताब्यात

दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करणाऱ्या दोघांना नाशिकमध्ये ताब्यात घेण्यात आलेय. 

Updated: Jul 8, 2017, 08:39 AM IST
दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा तयार करणारे दोघे ताब्यात title=

नाशिक : दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करणाऱ्या दोघांना नाशिकमध्ये ताब्यात घेण्यात आलेय. 

संशयित आकाश भावसार, संतोष तमखाने यांना आडगाव पोलिसांनी ताब्यात घेतलेय. स्कॅनर आणि प्रिंटरच्या मदतीने हे दोघे दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा तयार करत होते. 

या बनावट नोटा चलनातही आणल्या गेल्या होत्या. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून दोन हजारांच्या सहा नोटा, प्रिंटर आणि स्कॅनर जप्त करण्यात आलेत.