पुणे : कामावर सतत गैरहजर राहणा-या तब्बल १५८ पीएमपीएल कर्मचा-यांवर संक्रांत कोसळलीय. पीएमपीएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी त्यांची सेवा समाप्त करून त्यांना घरी पाठवले आहे.
कामावरून काढून टाकण्यात आलेले सगळे कर्मचारी बदली - हंगामी तसेच रोजंदारी तत्वावरील होते. त्यांनी सुटीचे दिवस सोडून महिन्यात किमान २१ दिवस कामावर हजर राहणे आवश्यक आहे. मात्र त्यांच्याकडून करारातील तरतूदीचं पालन होत नसल्याचं निदर्शनास आल्यानं ही कारवाई करण्यात आलीय.
पीएमपीएलला शिस्त लावणे तसेच कामात सुसुत्रता आणण्याच्या दृष्टीकोनातून तुकाराम मुंढे यांनी पहिल्या दिवसापासून कठोर पावले उचलली आहेत. तीनच दिवसांपूर्वी कामात हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरून १३ वाहतूक निरिक्षकांना निलंबित करण्यात आलय.
आतपर्यंत पीएमपीएल मधील २०० वर कर्मचारी, अधिकार्यांना मुंढेंनी घरी पाठवलय. मुंढे करत असलेल्या कारवाईबद्दल कर्मचार्यांमध्ये असंतोष आहे. ते आंदोलनाच्या तयारीत आहे. त्याची दिशा ठरवण्यासाठी त्यांची आज संघटनेच्या कार्यालयात बैठक होणार आहे.