पुणे : पुणे महानगर परिवहनचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांना पुन्हा धमकीचं पत्र मिळालय. पत्रामध्ये त्यांना जीवितहानी पोहचवली जाईल असं म्हंटलय. या पत्रात मुंढे यांच्याविषयी अश्लाघ्य भाषेचा वापर करण्यात आलाय.
याप्रकरणी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तुकाराम मुंढे यांना एका महिन्यात दुस-यांदा धमकी देणार पत्र देण्यात आलय. तुकाराम मुंढे नवी मुंबई महापालिका आयुक्त होते. त्यावेळी त्यांच्या कार्यक्षमतेमुळे ते चर्चेत आले होते.