पुणे - अहमदनगर महामार्गावर ट्रक - कारचा मोठा अपघात, पाच जण जागीच ठार

Pune-Ahmednagar highway Accident : पुणे - अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात झाला असून या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला.  

Updated: Aug 17, 2022, 08:15 AM IST
पुणे - अहमदनगर महामार्गावर ट्रक - कारचा मोठा अपघात, पाच जण जागीच ठार title=

पुणे : Pune-Ahmednagar highway Accident : पुणे - अहमदनगर महामार्गावर रांजणगाव येथे भीषण अपघात झाला. कार आणि ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. मध्यरात्री हा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

चुकीच्या बाजुने ट्रक रसत्याच्या मध्ये कार समोर आल्याने कारची धडक होऊन हा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कारमधील पाच जण जागीच ठार झालेत तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. (Truck-car accident on Pune-Ahmednagar highway)

कारमधून प्रवास करणारे हे पनवेल येथे जाण्यासाठी निघाले होते. यावेळी रांजणगाव एमआयडीतील एलजी कंपनीसमोर हा भीषण अपघात झाला. चुकीच्या बाजुने आलेला ट्रक अचनाक रस्त्याच्या मध्ये आला. यावेळी भरधाव जाणारी कार या ट्रकवर जोरात आदळली. या अपघात कारमधील पाच जण जागीच ठार झालेत. तर गंभीर जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.