8 फुट लांब शक्तिशाली अजगर बकरी गिळतो तेव्हा...; पहा धक्कादायक व्हिडीओ

Snake Viral Video: एका धक्कादायक व्हिडीओने नेटकऱ्यांचा पायाखालची जमीन सरकली आहे. जेव्हा 8 फुटाचा शक्तिशाली अजगर बकरी गिळतो...

नेहा चौधरी | Updated: May 4, 2023, 05:09 PM IST
8 फुट लांब  शक्तिशाली अजगर बकरी गिळतो तेव्हा...; पहा धक्कादायक व्हिडीओ title=
trending Snake Viral Video python swallows whole goat videos in Maharashtra Dhule

प्रशांत परदेशी, धुळे : राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातला आहे. अशात शेतकरी हातातोंडाशी आलेलं पिक गमावल्यामुळे हैराण झाले आहेत. घराची, दुकानांची अवस्था दैननीय झाली आहे. प्राण्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. साप अजगर रस्ते आणि घरांमध्ये दिसून येतं आहेत. (Python Snake videos)

एका महाकाय आठ फुटाच्या शक्तिशाली अजगराने एक बकरीची शिकार केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. ही दृश्यं विचलित करणारी आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अजगराने एका बेकरीला फस्त केल्यानंतर तो दुसऱ्या बेकरीला गिळत असताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अजगराचं पोट फुगलेलं दिसतंय. या 8 फूट अजगराने संपूर्ण बेकरी गिळल्यानंतर तो दुसऱ्या बेकरीचा शिकार करण्याचा तयारी होता. (python attack)

हा धक्कादायक व्हिडीओ महाराष्ट्रातील धुळे शहरातील आहे. धुळे शहरातील नकाने तलाव परिसरातमध्ये हा अजगर आढळून आला. त्या परिसरातील जिमखाना जवळ अजगर बेकरीची शिकार करताना स्थानिकांनी दिसला. (trending Snake Viral Video python swallows whole goat videos in Maharashtra Dhule)

या घटनेची माहिती स्थानिकांनी ताबडतोब सर्पमित्रांना दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोटात बकरी असल्याने अजगराला हालचाल करणं कठीण झालं होतं. दरम्यान सर्पमित्रांनी अजगराला सुरक्षित ठिकाणी सोडलं. 

कधी कधी असे व्हिडीओ व्हायरल होतात जे पाहून अंगावर शहारा येतो. असाच एक अजून अजगराचा व्हिडीओ पाहून आपल्याला घाम फुटतो. या व्हिडीओमध्ये विशालकाय आणि महाकाय अजगराला एक व्यक्ती डोळे मिटण्याच्या आत तो त्याचा तोंडाला पकडतो. आपल्याला तर सापाचं नाव घेतलं तरी घाबरायला होतं. त्यात असे व्हिडीओ पाहून हृदयाचे ठोके चुकतात. 

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर therealtarzann नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला  9 लाख 31 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. 

दुसरीकडे अवकाळी पावसाचा फटका अकोला जिल्ह्यायीतल मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसोमधील कुक्कुटपालन केंद्रालाही बसलाय. या केंद्रातील हजारो कोंबड्या मृत्यूमुखी झाल्या आहेत. यामुळे शेतकऱ्याचे 7 ते 8 लाखांचे नुकसान झाले आहेत. 

पोल्ट्री फॉर्ममधील कोंबड्यांच्या सुरक्षेसाठी बांधण्यात आलेले प्लॅस्टिक पडदे वादळाने उडून गेल्याने सगळीकडे पाणीच पाणी साचलं होतं. त्यांना देणार येणारं खाद्यसुद्धा पाण्याने भिजलं. त्यामुळे पाच हजार पक्ष्यांमधील तीन हजारांच्यावर कोंबड्यांचा थंडीने कुडकुडून मृत्यू झालाय.