Pooja Khedkar News: वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांच्यावर अखेर UPSCने कारवाई केली आहे. यूपीएससीने अखेर पूजा खेडकरला दोषी ठरवलं आहे. तसंच, पूजा खेडकरचं प्रशिक्षणार्थी पद तात्पुरतं रद्द करण्यात आलं आहे. UPSC परीक्षा देण्यास आजीवन बंदी घालण्यात आली आहे. पूजा खेडकर हिने अटकपूर्व जामीनासाठी दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर बुधवारी कोर्टात सुनावणी झाली. यावेळी पूजा खेडकरबाबत अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 9 वेळा परीक्षा देण्याची मुभा असताना पूजा खेडकर हिने तब्बल 12 वेळा परीक्षा दिली. यावेळी परीक्षा देता यावी यासाठी तिने चक्क 10 वेळा नावात बदल केला. स्वतःबरोबरच वडिल व आईचे नावही बदलण्यात आल्याचे समोर आले आहे. IAS Academy मसुरीतही तिला गैरवर्तवणुकीबद्दल 8 वेळा मेमो देण्यात आला होता.
पूजा खेडकर हिने यूपीएससीसाठी ओबीसी प्रवर्गातून अर्ज केला होता. त्यानुसार तिला फक्त 9वेळा परीक्षा देण्याची मुभा होती. पण स्वतःसह तिने वडील व आईच्या नावात बदल करुन 12 वेळा परीक्षा दिल्याचे उघड झाले आहे, असा आरोप तिच्यावर आहे. 2019 ला युपीएससी परीक्षा दिली, तेव्हा यादीमध्ये त्यांचं नाव खेडेकर पूजा दिलीपराव असं आहे. शिवाय आडनावाने सुरुवात आहे. त्याचप्रमाणे दिलीपराव या नावात इंग्रजी स्पेलिंग Deeliprao असं लिहिण्यात आलं आहे.
2021 ची यादी पाहिल्यास त्यात त्यांचं नाव पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं आहे. म्हणजे आडनाव शेवटी आहे. वडिलांच्या नावाआधी आईच म्हणजेच मनोरमा नाव आहे. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे वडिलांच्या नावाची स्पेलिंग dilip लिहिण्यात आली आहे. वडिलांच्या नावात 7 वेळा खेडकर दिलीपराव कोंडिबा, 2 वेळा खेडकर दिलीप के, 1 वेळा दिलीप खेडकर आणि 1वेळा दिलीप के खेडकर असे नमूद केलं आहे.
आईचे नाव 4 वेळा खेडकर मनोरमा दिलीपराव, 3 वेळा बुधवंत मनोरमा जगन्नाथ, 2 वेळा बुधवंत मनोरमा जे. व 3 वेळा मनोरमा बुधवंत असा वापर केला आहे.
वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे पूजा यांचे वडील दिलीप खेडकर यांनी बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे असलेल्या 14 गुंठे जमिनीच्या सातबारातील आपल्या नावातील वडिलांचे नाव बदलले आहे दिलीप धोंडीबा खेडकर ऐवजी आता नवीन नाव दिलीप कोंडीबा खेडकर असा बदल केला आहे.