Mumbai Pune Express highway : एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी कायम, रात्रीही वाहनांच्या रांगाच रांगा

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर (Mumbai-Pune Express highway) वाहतुकीची प्रचंड (Traffic Jam) कोंडी झाली आहे.

Updated: Aug 13, 2022, 11:49 PM IST
Mumbai Pune Express highway : एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी कायम, रात्रीही वाहनांच्या रांगाच रांगा title=

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर (Mumbai-Pune Express highway) वाहतुकीची प्रचंड (Traffic Jam) कोंडी झाली आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेक लोक बाहेर पडले आहेत. त्यामुळेच वाहतुकीवर ताण आला आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच संपूर्ण एक्सप्रेस हायवेवर वाहनांच्या लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. (traffic congestion continues on express highway vehicles queue up even at night)

खालापूरसह संपूर्ण एक्सप्रेस हायवेवर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्याने एक्स्प्रेस वे जॅम झाला आहे. खंडाळा घाट ते आडोशी बोगदा असा सुमारे 4 ते 5 किलोमीटर पर्यंतच्या रांगा एक्सप्रेस हायवेवर लागल्या आहेत. एक्सप्रेस हायवेने प्रवास करणार्‍या प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सुट्टीचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांचा काहीसा हिरमोड झाल्याचे चित्र आहे.