हुल्लडबाजी रोखण्यासाठी या किल्ल्यांवर पर्यटकांना जाण्यास मज्जाव

 पर्यटकांवर पोलिसांची करडी नजर

Updated: Dec 31, 2020, 06:16 PM IST
हुल्लडबाजी रोखण्यासाठी या किल्ल्यांवर पर्यटकांना जाण्यास मज्जाव  title=

पुणे : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुणे मुंबईतील पर्यटक मावळला पसंती देतात पण तिथल्या गडकिल्ल्यांवर अनेकदा हुल्लडबाजी घडते. याला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कार्ला,लोहगड, विसापूर, तुंग, राजमाची, तिकोणा या किल्ल्यांवर पर्यटकांना जाण्यास मज्जाव केलाय. गडकिल्ल्यांच्या परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर देखील करडी नजर ठेवून कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी माथेरान नगरपरिषदेनं मात्र जय्यत तयारी केली आहे. थर्टी फर्स्ट एन्जॉय करण्यासाठी येणाऱ्यांसाठी प्रवेशद्वारावर सजावट करण्यात आली आहे.

न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी लोकं मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आहेत. त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण आपल्या कुटुंबासोबत बाहेर फिरायला जातात. त्यामुळे पोलिसांची देखील जय्यत तयारी केली आहे. मद्यपान करुन वाहन चालवणाऱ्या लोकांवर कारवाई केली जाणार आहे. रात्री ११ नंतर संचारबंदी असल्याने लोकं त्याआधीच पर्यटनासाठी निघाले आहेत.