Rain Update : पावसाने झोडपले; कोंडीने छळले! 'असा' असेल पावसाचा अंदाज

मागच्या काही दिवसांपासून थैमान घातलेल्या पावसाने (Monsoon Update) दोन दिवस पश्चिम महाराष्ट्रात उघडीप दिली. मुंबई आणि उपनगर परिसरात रात्रभर पावसाची संततधरा सुरु आहे. सध्या मुंबईत (mumbai rain) रिमझिम पाऊस सुरू असून मुंबईतील लोकल वाहतूक आणि रस्ते (road transport) वाहतूक सुरळीत आहे.

Updated: Sep 18, 2022, 08:00 AM IST
Rain Update : पावसाने झोडपले; कोंडीने छळले! 'असा' असेल पावसाचा अंदाज  title=

Rain Update : मागच्या काही दिवसांपासून थैमान घातलेल्या पावसाने (Monsoon Update) दोन दिवस पश्चिम महाराष्ट्रात उघडीप दिली. मुंबई आणि उपनगर परिसरात रात्रभर पावसाची संततधरा सुरु आहे. सध्या मुंबईत (mumbai rain) रिमझिम पाऊस सुरू असून मुंबईतील लोकल वाहतूक आणि रस्ते (road transport) वाहतूक सुरळीत आहे.

दरम्यान उद्यापासून राज्यात (state monsoon) पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आली आहे.  

मुंबईसह उपनगरात पावसाने मागच्या 24 तासांत जोरदार हजेरी लावली. (mumbai pune rain weather update) याचबरोर पुण्यात पावसाचा जोर वाढल्याने धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून खडकवासलासह अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. तर दुसरीकडे मुंबईसह उपनगरातही पावसाची रिपरिप सुरूच आहे. याशिवाय कोकण आणि मध्य महाराष्ट्रात (maharashtra rain update) पावसाने हजेरी लावली. तसेच सातारा जिल्ह्यातील कोयनेतूनही पाण्याच विसर्ग वाढवण्यात आला आहे.

वाचा : विकेंडला बाहेर फिरण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी! 

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलढाणा, परभणी, वर्धा, नांदेड, अकोला जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. आजही राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पालघर आणि रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.