मुंबई : कोकणात न्यू इयर सेलिब्रेशन आणि नाताळच्या सुट्टीसाठी जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कोकण रेल्वेवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. कोकण रेल्वेच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या आडवली स्थानकावर लूप लाइनचं काम केलं जाणार आहे.
त्यामुळे रात्री पाऊणे बारा वाजल्यापासून निवसर ते विलवडे स्थानकांच्या दरम्यान आठ तास वाहतूक बंद राहणार आहे. या दरम्यान धावणाऱ्या दहा गाड्यांच्या वाहतुकीवर मेगाब्लॉकचा परिणाम होणार आहे.
नाताळच्या सुट्टीसाठी आणि नवीन वर्षाचे सेलिब्रेशनसाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. मात्र या मेगाब्लॅकमुळे काही रेल्वे गाड्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही गाड्या आठ तासांच्या वेळेत थांबविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
मुंबई-मंगलुरू एक्स्प्रेस, गांधीधाम-नागरकॉइल एक्स्प्रेस, कोचुवेली-डेहराडून एक्स्प्रेस, दादर सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस, एर्नाकुलम-हजरत निजामुद्दिन मंगला एक्स्प्रेस, एलटीटी-मडगाव डबलडेकर, कोचुवेली-इंदूर एक्स्प्रेस, मडगाव-रत्नागिरी आणि रत्नागिरी-मडगाव पॅसेंजर या दहा गाड्या ठिकठिकाणी थांबवून ठेवल्या जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे.