मुंबई : राज्यात महिन्यांपूर्वी कोरोनामुळे (Corona In Maharashtra) अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं. कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात आला. यामध्ये अनेक निर्बंध लावण्यात आले. दरम्यान आता राज्यातील आरोग्य यंत्रणांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. राज्यातील रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 14 हजार 152 नव्या कोरोना रुग्णांचं निदान झालं आहे. तर 20,852 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तर 289 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Today June 4 2021 14 thousand 152 patients of Corona were found in Maharashtra)
राज्यात एकूण रुग्ण किती?
राज्यात 1 लाख 96 हजार 894 सक्रीय रुग्ण आहेत. म्हणजेच इतक्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. तसेच आतापर्यंत एकूण 55 लाख 7 हजार 58 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सातत्याने रुग्णसंख्येत होत असलेली घट ही दिलासादायक बाब आहे.
Maharashtra reports 14,152 new #COVID19 cases, 289 deaths and 20, 852 recoveries in the last 24 hours
Active cases: 1,96,894
Total cases: 58,05,565
Total discharges: 55,07,058 pic.twitter.com/mEX2FhHspP— ANI (@ANI) June 4, 2021
मुंबईत किती रुग्ण?
मुंबईतही गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत होते. मात्र मुंबईच्या रुग्णसंख्येतही घट झालेली आहे. मुंबईत गेल्या 24 तासात एकूण 973 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 1 हजार 207 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आता केवळ 16 हजार 347 रुग्ण कोरोनाबाधित आहेत.
#CoronavirusUpdates
४ जून, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण - ९७३
२४ तासात बरे झालेले रुग्ण - १२०७
बरे झालेले एकूण रुग्ण - ६७६४००
बरे झालेल्या रुग्णांचा दर - ९५%एकूण सक्रिय रुग्ण- १६३४७
दुप्पटीचा दर- ५१५ दिवस
कोविड वाढीचा दर ( २८ मे ते ३ जून)- ०.१३ % #NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 4, 2021
मुंबईत आतापर्यंत एकूण 6 लाख 76 हजार 400 रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या बरे होण्याचा दर हा 95 टक्क्यांवर पोहचला आहे. तसेच रुग्ण दुप्पटीचा दर हा 515 दिवसांवर गेला आहे.
संबंधित बातम्या :
MHT-CET 2021 : राज्यातील सीईटीच्या परीक्षेबाबत महत्त्वाची बातमी