पुणे : Pune Shocking news : भीक मागण्यासाठी आणि लग्नात हुंडा मिळवण्यासाठी एका तीन वर्षांच्या मुलीचं पुण्यातून अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. (Three year old girl Kidnapping for begging in Pune) या तीन वर्षांच्या मुलीला श्रीगोंदा इथे घेऊन जाणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Woman held for kidnapping 3-yr-old girl from footpath in Pune)
पुणे कोरेगाव पार्क पोलिसांनी सोमवारी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील उषा नामदेव चव्हाण (40) हिला ढोले पाटील रस्त्यावरील फूटपाथवरुन तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अटक केली. ही घटना 23 मे रोजी घडली. महिलेने गुन्ह्याच्या वेळी बाळगलेल्या हातातील पिशवीच्या नावाचा उल्लेख करून पोलिसांनी अपहरणकर्त्याचा शोध घेतला.
मुलीची सुखरुप सुटका झालीय. उषा चव्हाण असे या आरोपी महिलेचं नाव आहे. ती श्रीगोंद्याचीच रहिवासी आहे. उषा चव्हाण ही रेकॉर्डवरची सराईत गुन्हेगार आहे. पुण्यात ढोलेपाटील रोडवर एका फुगे विकणाऱ्या महिलेच्या तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण झालं होते. ही मुलगी आईसह एका रिक्षात झोपली होती. तेव्हा या मुलीला अलगद उचलून पळवून नेण्यात आले. पोलिसांनी तब्बल 5 दिवस 250 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि हातातल्या पिशवीच्या नावावरुन थेट आरोपी महिलेचे घर गाठले आणि आरोपीला अटक केली.
उषा चव्हाण हिला दोन मुलगे आणि दोन मुली आहेत. उषा चव्हाण हिच्या समाजात मुलीचं लग्न करताना मुलाकडून हुंडा घेण्याची प्रथा आहे. अपहरण झालेल्या मुलीला भीक मागायला लावणं तसेच पुढे तिचं लग्न करून मग हुंडा उकळणं यासाठी तिचे अपहरण केले होते.
पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी मुलीचे अपहरण केल्यानंतर तिला शालीने गुंडाळले. तिच्या बॅगेवर असलेल्या किरकोळ विक्रेत्याच्या नावामुळे आम्हाला तिचा शोध घेण्यात आणि अटक करण्यात मदत झाली. किरकोळ विक्रेत्याच्या अहमदनगरमध्ये श्रीगोंदा आणि काष्टी येथे शाखा आहेत. पोलीस पथकाने श्रीगोंदा येथे जाऊन मुलीचा शोध घेतला. षा चव्हाण ही मुलगी घेऊन आल्याची खात्री केल्यानंतर स्थानिक माहिती देणाऱ्यांनी तिचा ठावठिकाणा पोलिसांना सांगितला. तिला रंगेहात पकडण्यात आले आणि मुलगी तिच्या घरात सापडली.
वरिष्ठ निरीक्षक विनायक वेताळ, निरीक्षक दीपाली भोसले आणि सहायक निरीक्षक अमोल घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव पोलिसांच्या पथकाने आरोपीला तिच्या श्रीगोंदा येथील राहत्या घरातून अटक केली.