अवघ्या दीड तासात नाशिकमध्ये तीन खून

नाशिक शहरात गुन्हेगारी आटोक्यात असल्याचा दावा पोलीस करत असतानाच, खुनाच्या तीन घटनांनी नाशिक हादरून गेलंय.

Updated: Dec 28, 2017, 11:17 PM IST
अवघ्या दीड तासात नाशिकमध्ये तीन खून  title=

नाशिक : नाशिक शहरात गुन्हेगारी आटोक्यात असल्याचा दावा पोलीस करत असतानाच, खुनाच्या तीन घटनांनी नाशिक हादरून गेलंय. बुधवारी रात्री अवघ्या दीड तासाच्या कालावधीत खुनाच्या तीन घटना घडल्या.

डीजीपी नगरमध्ये साहेबराव निबा जाधव या रिक्षाचालकाचा भोसकून खून करण्यात आला. मागील भांडणाची कुरापत काढून हा खून करण्यात आल्याची नोंद पोलीस दप्तरी करण्यात आलीय.

राजीवनगर परिसरात अज्ञात मारेकऱ्यांनी देविदास इगे आणि दिनेश बिरासदार या दोघांवर हल्ला करून त्यांची हत्या केली. ज्यांची हत्या झाली, त्या दोघांवरही राजीवनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते. या तिन्ही खूनप्रकरणी पोलिसांनी एकूण ८ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय.