याला म्हणतात खरी दिल दोस्ती दुनियादारी! मालेगाव मध्ये हेलिकॉप्टर मधून काढली मित्राच्या मुलीच्या लग्नाची वरात

Malegaon Wedding Viral News: आदिवासी कुटूंबातील नवदाम्पत्याला हेलिकॉप्टर सवारी घडवून मालेगावच्या बारा बलुतेदार मित्र मंडळाचे संस्थापक बंडूकाका बच्छाव यांनी आपल्या आदिवासी मित्राला दिलेला शब्द पूर्ण केला. एवढेच नाही तर या आदिवासी दाम्पत्यांचा विवाहही धुमधडाक्यात लावून दिल्याने आदिवासी बांधवांचा आनंद गगनात मावत नव्हता.

Updated: Apr 24, 2023, 09:00 PM IST
याला म्हणतात खरी दिल दोस्ती दुनियादारी! मालेगाव मध्ये हेलिकॉप्टर मधून काढली मित्राच्या मुलीच्या लग्नाची वरात title=

निलेश वाघ, झी मीडिया, मालेगाव : दिल दोस्ती दुनियादारी नमेकी काय असते ते एका दिलदार मित्राने दाखवून दिले आहे  (True Friendship). मावेगामध्ये (Malegone) मैत्रीचा अनोखा किस्सा पहायला मिळाला.  दिलेल्या शब्द अनेकदा कोणी पळताना दिसत नाही त्यातल्या त्यात राजकारणी मंडळी तर दिलेला शब्द कधीच पाळत नाही. मालेगावमध्ये बंडूकाका बच्छाव यांनी मित्राला दिलेला शब्द पाळला आणि  हेलिकॉप्टर मधून काढली मित्राच्या मुलीच्या लग्नाची वरात काढली आहे.  

आदिवासी कुटूंबातील नवदाम्पत्याला हेलिकॉप्टर सवारी घडवून मालेगावच्या बारा बलुतेदार मित्र मंडळाचे संस्थापक बंडूकाका बच्छाव यांनी आपल्या आदिवासी मित्राला दिलेला शब्द पूर्ण केला. एवढेच नाही तर या आदिवासी दाम्पत्यांचा विवाहही धुमधडाक्यात लावून दिल्याने आदिवासी बांधवांचा आनंद गगनात मावत नव्हता.

समाजातील मोठ्या लोकांचे लग्नच थाटात संपन्न होतात आमचे आदिवासी मात्र कायम उपेक्षित राहतात.  मुलगी आणि जावई   लग्नाला हेलिकॉप्टरमधून यावे अशी इच्छा मालेगावच्या चंदनपुरी येथील आदिवासी मित्र कैलास पवार यांनी बंडूकाकाजवळ  व्यक्त केली होती. त्यांची इच्छा त्यांनी तात्काळ मान्य करून त्यांना ती पूर्ण करण्याचा शब्दही दिला. 

कैलास यांची कन्या पूर्वी हिचा आज मालेगावमध्ये विवाह होता. मित्राला दिलेला शब्द बंडूकाका बच्छाव यांनी पूर्ण करून दाखविला त्यांनी चक्क नवदाम्पत्याला हेलिकॉप्टरमधून सवारी घडवून उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत सप्तशृंगी गडाचा फेरा मारून विवाह स्थळी आणले. परत बिदाई देखील केली.

एवढ्यावरच बंडूकाका थांबले नाही तर  सर्व धर्मीय धर्मगुरूसह उघड्या जीपमधून मिरवणूक काढत राष्ट्रीय एकात्मतेचे संदेशही दिला. तसेच नवरा नवरीचा घोड्याच्या टांग्यातुन सवाद्य मिरवणूक काढून थाटामाटात लग्न लावून दिले. आदिवासी समाजाला मिळलेल्या मानपानाने आदिवासी बांधव भारावून गेले तर नव  दाम्पत्य व वधू माता- पित्याचा आनंद गगनात मावत नव्हता. मालेगाव तालुक्यात दिवसभर या दिलदार मित्राने मित्राला दिलेला शब्द पूर्ण केल्याची चर्चा होती.