हे अख्खं कुटुंब रंगलंय व्हॉ़यलिनमध्ये...

कोणतीही कला जगवायची असेल तर तिच्यासाठी तळमळ आणि कष्ट करण्याची तयारी लागते.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 8, 2018, 08:51 PM IST
हे अख्खं कुटुंब रंगलंय व्हॉ़यलिनमध्ये... title=

ठाणे : कोणतीही कला जगवायची असेल तर तिच्यासाठी तळमळ आणि कष्ट करण्याची तयारी लागते. ठाण्यातल्या तीन पिढ्या व्हॉयलिन वादनाचे धडे देतायत. महिला दिनानिमित्त पाहुया व्हॉयलिन वादनात रंगलेलं कुटुंब.  

डॉ. एन. राजम हे व्हॉयलिन विश्वातलं मोठं नाव

हे अख्खं कुटुंब रंगलंय व्हॉ़यलिनमध्ये. डॉ. एन. राजम हे व्हॉयलिन विश्वातलं मोठं नाव. या कलेसाठी त्यांचा पद्मभूषण पुरस्कारानंही गौरव करण्यात आलाय. त्यांची मुलगी डॉ. संगीता शंकर हिनंही वयाच्या तिस-या वर्षीपासून व्हॉयलिन वाजवायला सुरुवात केली. संगीताच्या दोन मुली नंदिनी आणि रागिणीही उत्तम व्हॉयलिन वाजवतात. 

हे अख्खं कुटुंब रंगलंय व्हॉ़यलिनमध्ये

नंदिनी आणि रागिणीसह हे अख्खं कुटुंब इतरांनाही व्हॉ़यलिनचे धडे देतं. व्हॉयलिन वादनाची ही कला आनंद देते, असं नंदिनी आणि रागिणी सांगतात. 

राजम यांच्या तीनही पिढ्या व्हॉयलिन वादन ही कला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करतेय. त्यांच्या या प्रयत्नांना शुभेच्छा.