Mumbai Crime News: MBA, IIT, मेकॅनिकल इंजिनिअर, हॉटेल मॅनेजमेंट... चोरीच्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींच्या डिग्री पाहून पोलिसही शॉक झाले आहेत. उच्चभ्रू लोकांना गंडा घालणाऱ्या उच्च शिक्षित टोळीला मुंबई पोलिसांनी गजाआड केले आहे. सध्या देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीची पहायला मिळत आहे. उच्च शिक्षीत तरुण नोकरीच्या शोधात फिरत आहेत. अशातच या टोळीला अटक केल्याने सुशिक्षीत तरुणांचे भयान वास्तव समोर आले आहे (Mumbai Crime News).
मुंबईतील उच्चभु लोकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना आर्थिक दृष्ट्या फासणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम टीमने जेरबंद केलं आहे. तामिळनाडू,हरियाणा,दिल्ली,उत्तर प्रदेश आणि गुजरात या राज्यातुन पाच आरोपीना अटक केली आहे.
उच्चभ्रू लोकांना सिटी बँक डायनर्स क्लबचे कार्ड घेऊन वेलींगटन या क्लबचे मोफत मेम्बर कार्ड मिळेल अशी बतावणी हे तरुण करत होते. लोकांकडून त्यांचे आधार कार्ड मागून त्यांना एक नवा मोफत फोन देऊन त्यांचे बँक डिटेल काढत. त्या पैशातून तनिष्क सुवर्ण पेढी किंवा रिलायन्स डिजिटल मधून मौल्यवान वस्तू विकत घेऊन त्या विकून पैसे जमा करत होते. याची तक्रार सायबर क्राईम कडे दीड महिन्यांपूर्वी आली त्यावर सायबर क्राईम ने तंत्रिक दृष्ट्या अभ्यास करून या टोळीला गजाआड केले.
मुंबई, नवी मुंबईत 32 पेक्षा जास्त गुन्हे करत लोकांना फसवलं असल्याचं उघड झाले आहे . हे आरोपी उच्च शिक्षण घतलेले आहेत. आरोपी आयआयटी, मेकॅनिकल इंजिनिअर, हॉटेल मॅनेजमेंट, एमबीए अस उच्च शिक्षण घेतलेले आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी रोख 3 लाख 87 हजार रुपये ,122 सिंगापूर डॉलर, कार मोटारसायकल असा एकूण 9 लाख 81 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या टोळीने आतापर्यंत 1 कोटी 20 लाख रुपयांच्या वर उच्चभु लोकांना गंडा घातल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती सायबर क्राईम चे पोलीस उपायुक्त बाळकृष्ण राजपूत यांनी दिली आहे