भाजपमध्ये फेरबदलाचे चंद्रकांत पाटलांचे संकेत, 'साईडलाईन' झालेल्यांना नवी जबाबदारी?

भाजपची राज्य कार्यकारिणी जाहीर होणार

Updated: Jul 2, 2020, 08:28 PM IST
भाजपमध्ये फेरबदलाचे चंद्रकांत पाटलांचे संकेत, 'साईडलाईन' झालेल्यांना नवी जबाबदारी? title=

अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या भाजपमध्ये साईडलाईन झालेल्या नेत्यांना पक्षात नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तसे संकेत दिले आहेत. उद्या भाजपची राज्य कार्यकारिणी जाहीर होणार आहे. यामध्ये या नेत्यांबाबत घोषणा होऊ शकते, असं मानलं जातंय.

चंद्रशेखर बावनकुळे यांना पक्षात प्रदेशाध्यक्षांनंतरचं महत्त्वाचं मानलं जाणाऱ्या प्रदेश सरचिटणीस पद दिलं जाऊ शकतं. पण खडसे, तावडे आणि पंकजा मुंडे यांच्याबद्दलचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही.