कोकण रेल्वेचा परतीचा प्रवास बिकट, 'तुतारी'चे दरवाजे बंद

गणेशोत्सवासाठी गावी कोकणात आलेल्या चाकरमान्यांनी आता परतीची वाट धरली आहे. मात्र, रेल्वेचा परतीचा प्रवास बिकट झालाय.  

Updated: Sep 1, 2017, 02:55 PM IST
कोकण रेल्वेचा परतीचा प्रवास बिकट, 'तुतारी'चे दरवाजे बंद title=

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी गावी कोकणात आलेल्या चाकरमान्यांनी आता परतीची वाट धरली आहे. मात्र, रेल्वेचा परतीचा प्रवास बिकट झालाय. रत्नागितीत खालून येणाऱ्या गाड्या खचाखच भरुन येत आहे. त्यात प्रवासी आतून दवाजे उघड नसल्याने तिकीट काढून प्रवाशांना प्रवास करता आलेला नाही.

रेल्वेने मुंबईत परतणाऱ्या रत्नागिरीतल्या चाकरमान्यांचे गुरुवारी रात्री चांगलेच हाल झाले. तळ कोकणातून आलेल्या तुतारी एक्सप्रेसच्या गाडीचे दरवाजे आतील प्रवाशांनी न उघडल्यामुळे रत्नागिरी रेल्वे स्थानकातले प्रवासी चांगले संतप्त झाले. दारावर पाय मारूनही आतील प्रवाशांनी दरवाजे उघडले नाहीत.

तसेच आर पी एफ जवान जागेवर येऊन देखील दरवाजे उघडले गेले नाहीत. जास्तीचा प्रयत्न करुन  ज्या काही ठिकाणी दरवाजे उघडले होते त्या ठिकाणी आतमध्ये शिरायला देखील जागा नव्हती. प्रवाशांचा कोंबून प्रवास सुरु होता. असे असताना जादा गाड्या किंवा जादा डबा का जोडण्यात आला नाही, असा सवाल करण्यात येत आहे.