वाशिम येथील तारांगण सुरू होण्याच्याआधीच आगीत जळून खाक; भर पावसात आग लागली कशी?

उद्घाटनाआधीच तारांगण आगीत जळून भस्म झाले आहे. वाशिम जिल्ह्यात उद्घाटनाआधी तारांगणला आग लागली आहे.

Updated: Sep 26, 2023, 05:08 PM IST
वाशिम येथील तारांगण  सुरू होण्याच्याआधीच आगीत जळून खाक;  भर पावसात आग लागली कशी? title=

Washim News : भारताची अंतराळ संस्था इस्रो चांद्रयान 3, आदित्य L1 सारख्या मोहिमा राबवून गगणभरारी घेत आहे. भाराताच्या या यशस्वी मोहिमांमुळे अनेकांची विज्ञानातील आवड वाढली आहे. अशातच वाशिम जिल्ह्यात उभारण्यात आलेले  तारांगण  सुरू होण्याच्याआधीच आगीत जळून खाक झाले आहे. 

उद्घाटनाआधीच तारांगण  जळाले

वाशिम जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांना अंतराळातील घडामोडींचे ज्ञान अवगत व्हावे. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशातून वाशिम नगरपरिषद ने टेंपल गार्डनमध्ये हे अद्यावर तारांगण  उभारण्यात आले होते. वाशिम नगरपरिषदेने अडीच कोटी रुपये खर्च केले होते.  आंतरराष्ट्रीय दर्जाचे तारांगण उभारण्यात आले. मात्र, हे तारांगण (प्लनेटोरियम) सर्वसामान्यासाठी खुले होण्याआधीचं आगीत भस्मसात झाले आहे.  टेम्पलगार्डन मध्ये असलेल्या तारांगणाला मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. तारांगणाच्या डोम मधून आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. तारांगणासह त्यामधील साहित्य जळाले. अग्निशमन दलाने एका तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.  भर पावसात तारांगणाला आग लागल्याने तर्कवितर्क वर्तविण्यात येत आहेत.

पुण्यात थ्री डी तारांगण

चंद्रावर पडलेलं पाहिलं मानवी पाऊल, अंतराळात फिरणारे असंख्य ग्रह, लकलकणारे तारे, अवकाशात झेपावणारी अंतराळ यानं, खगोल विश्वात घडणाऱ्या प्रलयंकारी घटना  हे सारंकाही अगदी तुमच्या डोळ्यासमोर घडतं. हे केवळ स्थिर चित्रण नाही तर एक प्रकारचा जिवंत देखावा आहे. अंतराळात घडणाऱ्या प्रत्येक हालचालीसोबत तुम्ही अक्षरशः एकरूप होता. अचंबीत करणारा हा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला या अनोख्या तारांगणाला भेट द्यावी लागेल. थ्री डी व्हिझ्युएलायझेशन तंत्रज्ञानाचा वापर करून हे तारांगण उभारण्यात आलय.  शालेय विद्यार्थी तसेच खगोल प्रेमींसाठी हे तारांगण म्हणजे वैज्ञानिक मेजवानी ठरणार आहे. 
राजीव गांधी इ लर्निंग स्कुलच्या टेरेसवर हा डोम साकारण्यात आलाय. रशियन कंपनीच्या मदतीनं हे तारांगण उभारण्यात आलय. महापालिकेमार्फत उभारण्यात आलेलं हे देशातलं अशा स्वरूपाचं पाहिलंच तारांगण.. त्याला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख तारांगण असं नाव देण्यात आलंय. तारांगणातला एक शो सुमारे 25 ते 40 मिनिटांचा असेल. एकाच वेळी 55 जण या तारांगणातला शो पाहू शकतील.