Pune Monorail : पुणे शहरातील कोथरूडमध्ये थोरात उद्यानात नागरिकांच्या इच्छेविरुद्ध मोनोरेल प्रकल्प होणार नसल्याचं महापालिका आयुक्तांनी सांगितलं. प्रकल्पामुळे झाडांची कत्तल होणार असून उद्यानात यांत्रिकीकरण केलं जाणाराय. यामुळे मोकळा श्वास घेण्याकरता उद्यानात जागा शिल्लक राहणार नसल्यानं, या प्रकल्पला विरोध होतोय.
पुणे शहरातील कोथरूड परिसरात असणाऱ्या थोरात उद्यान या ठिकाणी मनपाच्या वतीने मोनोरेल प्रकल्प साकारत असून यामुळे सदर ठिकाणी झाडांची कत्तल केली जाणार असुन तसेच या उद्यान्यामधे यांत्रिकीकरण केले जाणार आहे. यामुळे उद्यान्यामधे मोकळा श्वास घेण्याकरिता जागा शिल्लक राहणार नाही, तसेच विकसित केलेले पदपथ, विरंगुळा केंद्र, लहान मुलांसाठी खेळणी आदी अनेक सुविधा काढाव्या लागणार आहेत. याचमुळे सदर प्रकल्पास नागरिकांतून विरोध होत असून कोथरूड मोनोरेल विरोधी कृती समिती आणि आदरणीय खा. वंदनाताई चव्हाण यांच्यावतीने या प्रकल्पाचे काम थांबवण्यात यावे, यासाठी मनपा आयुक्तांची भेट घेण्यात आली.
युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांच्या पुढाकाराने बैठकीचे आयोजन .यावेळी भेटीदरम्यान थोरात उद्यानाच्या सोबत मुठा नदी काठ सुशोभीकरण कामाबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी आयुक्तांनी नागरिकांच्या इच्छेविरुद्ध कोणताही उपक्रम राबविण्यात येणार नाही, अशी ग्वाही दिली आहे त्याचप्रमाणे खडकवासला धरण क्षेत्राच्या लगत वाढत असलेल्या शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात तेथील मैला पाणी खडकवासला धरणामध्ये मिसळत आहे. याबाबत सुद्धा लवकरात लवकर मार्ग काढणे आवश्यक आहे ही बाब सुद्धा मा. आयुक्त साहेब यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली
या दोन्ही स्थितींमध्ये आपण विकास साधत असताना ज्या निसर्गात वास्तव्य करतो, त्या निसर्गाकडे सहजासहजी दुर्लक्ष करून पर्यावरणाचा समतोल ढासळत आहोत, याची कल्पना आदरणीय आयुक्तांना देण्यात आली. भविष्यातही कोणताही उपक्रम हाती घेतल्यानंतर शाश्वत विकास साधला जावा आणि नागरिकांचे कायमस्वरूपी कल्याण चिंतून निर्णय प्रक्रिया पार पडावी, ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या दोन्ही मुद्द्यांवर आदरणीय आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत नागरिकांच्या इच्छेविरुद्ध कोणताही उपक्रम न राबविण्याचा तसेच पर्यावरणीय विचार करण्याचा शब्द दिला आहे.