पुणे: हडपसर येथील कचरा वाद पुन्हा पेटला

कचरा प्रश्नावरून हडपसर येथील नगरसेवक आणि स्थानिक नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. कचरा घेऊन हडपसरच्या कचरा डेपोकडे आलेल्या सर्व गाड्या संतप्त नागरिकांनी परत पाटवल्या. तसेच, आता सनदशीर मार्गानी गाड्या परत पाठवल्या आहेत. मात्र, यापुढे प्रत्येक वेळी आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही या मंडळींनी दिला आहे.

Updated: Oct 25, 2017, 11:56 AM IST
पुणे: हडपसर येथील कचरा वाद पुन्हा पेटला title=

पुणे : कचरा प्रश्नावरून हडपसर येथील नगरसेवक आणि स्थानिक नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. कचरा घेऊन हडपसरच्या कचरा डेपोकडे आलेल्या सर्व गाड्या संतप्त नागरिकांनी परत पाटवल्या. तसेच, आता सनदशीर मार्गानी गाड्या परत पाठवल्या आहेत. मात्र, यापुढे प्रत्येक वेळी आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही या मंडळींनी दिला आहे.

कचरा प्रश्नावरून आक्रमक झालेल्या नागरिकांनी, आता सनदशीर मार्गानी गाड्या परत पाठवल्या आहेत. जर नविन प्रकल्पाचे  बांधकाम सत्ताधा-यांनी थांबवले नाही तर रोकेम प्रकल्प सुध्दा बंद पाडला जाईल असा सज्जड इशाराच यावेळी दिला.

रामटेकडी येथे सध्या ३०० टन प्रतिदिन कचरा येत आहे जर १२५० टनांचे नविन प्रकल्प चालु झाले तर रामटेकडी वसाहती तील नागरीकांना रस्त्यावर चालणेही मुश्किल होईल. त्यामुळे कचरा डेपोला विरोध असल्याचेस्थानिक नगरसेवकांचं म्हणणं आहे.

दरम्यान, भाजप वगळता सर्व पक्षांचा या कचरा प्रकल्पाला विरोध आहे. आज गाड्या पाठवल्या उद्या फोडू असा इशाराही या वेळी ग्रामस्थांनी दिला