नातवानेच केला आजीचा खून

नातवाने केले दारूच्या नशेत हे कृत्य, 

Updated: Aug 24, 2022, 01:33 PM IST
नातवानेच केला आजीचा खून  title=
गंगुबाई रामा गुरव

सोनू भिडे, नाशिक:   

अस म्हणतात मुलावर आई नंतर आजीचा हक्क जास्त असतो. लहानपणी आजीच्या कुशीत खेळून मोठा होतो. आणि हीच आजी (grandmother) नातवाची (grandson) खूप काळजी आणि जबाबदारी सांभाळते मात्र याच नातवाने आजीची हत्या केल्याची घटना नाशिकच्या हरसूल येथे उघडकीस आली आहे. गंगुबाई रामा गुरव असे मृत्यू झालेल्या आजीचे नाव असून हरसूल पोलीस ठाण्यात नातवाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे घटना

गंगुबाई रामा गुरव (वय ७० वर्ष) या त्यांच्या कुटुंबीयांसोबत नाशिक जिल्ह्यातील (Nashik Dist.) हरसूल गावातील इंदिरानगर भागात वास्तव्यास आहे. गंगुबाई यांच्या सोबत त्यांचा मुलगा, सून आणि नातू राहतात. मोलमजुरी करून कुटुंब चालवतात. नातू दशरथ किसन गुरव (वय २२ वर्ष) याला दारू पिण्याची सवय होती.

सोमवारी रात्री दशरथ हा दारू पिऊन घरी आला होता. रात्री जेवायला दिले नाही याचा राग आल्याने दशरथ याने आजीच्या उजव्या डोळ्याजवळ हातात घातलेल्या लोखंडी कड्याच्या सहाय्याने वार केला. यात आजी गंगुबाई या गंभीर जखमी झाल्या होत्या. दशरथ नशेत असल्याने त्याने रात्री काय केले हे त्याच्या लक्षात आले नाही. मंगळवारी सकाळी उठल्यावर आजी गंगुबाई यांचा मृत्यू झाला असल्याच लक्षात आल.

सदर घटनेबाबत हरसूल पोलीसाना (Harsul Police) कळविण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी नशेत असलेला नातू दशरथ गुरवला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास करत आहेत. 

नातवालाच लहानपणी मांडीवर खेळवणाऱ्या आजीचा जीव घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातील तरुण मंडळी सध्या नशेच्या आहारी जात आहेत. नशेत असताना नात्याला काळिमा फासणाऱ्या घटना सुद्धा घडल्या आहेत. आता गरज आहे ती ग्रामीण भागातील तरुणांना समुपदेशन करण्याची....