Shiv Sena Crisis : केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे शिवसेना (shivsena) आणि धनुष्यबाण (Dhanushyaban) चिन्ह शिंदे गट अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मिळाले आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण निशाणी मिळाल्यानंतर शिंदे शिवसेना कार्यकारिणी पहिली बैठकी पार पडली. या बैठकीत शिंदे गटाने अत्यंत महत्वपूर्ण ठराव मंजूर केले आहेत. शिंदे गटाची ताकद आणखी वाढली आहे. यामुळे येणार काळ ठाकरे गटासाठी अडचणीचा ठरणार आहे (Maharashtra Politics News).
मुंबईतल्या हॉटेल ताज प्रेसिडन्सीत शिवसेना कार्यकारिणी पहिली बैठक झाली. शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण निशाणी ही शिंदे गटाला मिळाल्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची आज पहिली बैठक होत आहे.
शिवसेना कार्यकारिणी बैठकीत एकनाथ शिंदेंच्या मुख्य नेतेपदावर शिक्कामोर्तब करण्यात आले. शिंदेंना सर्वाधिकार देण्याचा ठराव एकमतानं संमत झाला.
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सर्व अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोपवण्यात आले असून त्यांची मुख्य नेतेपदी निवड कायम करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या असून त्यावर इतर नेत्यांची निवड करण्यात आलीय. सिद्धेश रामदास कदम यांना शिवसेना सचिव पद नेते देण्यात आले आहे.
दाद भुसे यांच्यावर शिस्त भंग समीतीची जबाबदारी सोपवण्यात आलेय. तसेच निवडणूक आयोगा संदर्भात ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी जे आक्षेपार्ह वक्तव्य केले त्या विरोधात निषेचा ठराव देखील मांडण्यात आला.शिस्तभंग समिती स्थापन केली जाणार यामध्ये दादा भुसे शम्भूराजे देसाई,संजय मोरे असणार आहेत.पक्षविरोधी वर्तणूक केल्यास नेते पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार
चर्चगेट रेल्वे स्टेशनला माजी केंद्रीय मंत्री चिंतामणराव देशमुख यांचे नाव देणे. राज्यातील भूमीपूत्रांना 80% नोकरी देणे. सर्व प्रकल्पात भूमीपूत्रांना 80% नोकरीमध्ये स्थान देणार. मराठी भाषेला अभीजात भाषेचा दर्जा देणार. स्वातंत्र्यवीर सावकरकरांना “भारतरत्न” देणे. लोकसभा गट नेते खासदार राहुल शेवाळे यांनी सर्वात प्रथम लोकसभेत ही मागणी केली होती. UPSC आणि MPSC च्या मराठी मुलांना भक्कम पाठिंबा देणार असे महत्वाचे निर्णय शिवसेना कार्यकारणी बैठकीत घेण्यात आले.
या बैठकीत उद्धव ठाकरेंना सर्व अधिकार असलेली शिवसेनेची 2018 ची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. मात्र. याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. यापूर्वी बाळासाहेब ठाकरेंनी 1999 मध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी बनवली होती.