...म्हणून मला हेलिकॉप्टर घेऊन द्या; जालना येथील शेतकऱ्याची तहसीलदारांकडे अजब मागणी

शेतकऱ्याने तहसीलदाराकडे केलेली अजब मागणी चर्चेत आली. आजूबाजूचे शेतकरी मला त्यांच्या शेतातून जाऊ देत नाहीत यामुळे  मला हेलिकॉप्टर घेऊन द्या अशी मागणी शेतकऱ्याने केलीय. 

Updated: Jul 5, 2023, 07:17 PM IST
...म्हणून मला हेलिकॉप्टर घेऊन द्या; जालना येथील शेतकऱ्याची तहसीलदारांकडे अजब मागणी title=

Maharashtra Farmer Demand : जालना येथील एका शेतकऱ्याने तहसीलदारांकडे अजब मागणी केली आहे. शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. यामुळे मला हेलिकॉप्टर घेऊन द्या अशी या  शेतकऱ्याची मागणी आहे. शेतकऱ्याने एका पत्राद्वारे ही मागणी केली आहे. या अजब मागणीमुळे शेतकरी चांगलाच चर्चेत आला आहे. हेलिकॉप्टरची मागणी करणारे निवेदन चांगलेच व्हायरल झाले आहे.   

आजूबाजूचे शेतकरी मला त्यांच्या शेतातून जाऊ देत नाही

मला शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. आजूबाजूचे शेतकरी मला त्यांच्या शेतातून जाऊ देत नाही. त्यामुळे शेतात जाण्यासाठी मला रस्ता द्या किंवा हेलिकॉप्टर घेऊन द्या"अशी लेखी मागणी जालन्यातील एका शेतकऱ्यानं जाफ्राबादच्या तहसीलदारांकडे केली आहे. सुनील भोपळे असं हेलिकॉप्टरची मागणी करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे.

नेमका काय आहे प्रकार?

सुनील यांची जाफ्राबाद तालुक्यातील देऊळझरी शिवारातील गट नंबर 350 मध्ये जमीन आहे. पण आजूबाजूचे शेतकरी त्यांना शेतीमशागतीसाठी जाऊ देत नाही. त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता देखील देत नाही. त्यामुळे वैतागलेल्या या शेतकऱ्यानं अखेर तहसीलदारांना गाठून हेलिकॉप्टरची लेखी मागणी केली आहे. या मागणीनंतर तहसीलदारांनी तलाठी आणि मंडळाधिकाऱ्यांना पाठवून पंचनामा केला आहे.

लग्नाच  वऱ्हाड चक्क हेलिकॉप्टरमध्ये आले

मावळमध्ये ढोणे गावात एका नवरदेवानं त्याचं वऱ्हाड चक्क हेलिकॉप्टरमध्ये बसवून घेऊन गेला.लग्नासाठी वाडेकर कुटूंबियांनी पुणे येथील एका कंपनीचे हेलिकॉप्टर ७५  हजार रूपये प्रति तास दराने भाडेतत्वार घेतले.हेलिकॉप्टरला पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

गवंडीकाम करणा-या आई-वडिलांना हेलिकॉप्टर सफर घडवली 

गवंडीकाम करणा-या दाम्पत्याच्या मुलानं आपल्या आई-वडिलांचं आकाशात भरारी घेण्याचं स्वप्न साकार केलंय. त्यानं आपल्या आई-वडिलांना हेलिकॉप्टर सफर घडवलीय. पनवेल मधील आजवली गावात राहणारे वसंत मगर आणि उषा मगर गेल्या अनेक वर्षापासून गवंडी काम करतात. त्यांचा मुलगा उमेश मगर  शेअर मार्केट व्यावसायात आहे. आईवडिलांना हेलिकॉप्टर मध्ये बसवून उमेशनं त्यांना वेगळा आनंद देण्याचा प्रयत्न केलाय. यासाठी गेल्या सहा महिन्यापासून त्यानं तयारी सुरू केली होती.  आईवडीलांना घेवून त्यानं मुंबई ते पनवेल असा हेलिकॉप्टर प्रवास केला. मुलानं घडवलेली आगळी वेगळी सफर पाहून वसंत मगर आणि उषा मगर यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते.