मैत्रिणीसमोर मोठा भाऊ रागावला... पण, रागाच्या भरात तिने उचललं हे टोकाचं पाऊल

बहिणीला ओरडल्यानंतर भाऊ आंघोळीसाठी घराच्या मागील बाजूस गेला. आंघोळ करुन भाऊ परत आला तेव्हा त्याला दोन्ही दार बंद दिसले.

Updated: May 15, 2022, 03:56 PM IST
मैत्रिणीसमोर मोठा भाऊ रागावला... पण, रागाच्या भरात तिने उचललं हे टोकाचं पाऊल title=

भंडारा : सकाळी घरची मंडळी बाहेर कामासाठी गेली होती. समीक्षा आपल्या मैत्रिणीसोबत घरात मँगी तयार करत होती. त्यावेळी तिचा मोठा भाऊ तिथे आला. घरात कचरा पाहून तो तिला ओरडला. त्यामुळे तिच्या मैत्रिणी घरातून निघुन गेल्या.

बहिणीला ओरडल्यानंतर भाऊ आंघोळीसाठी घराच्या मागील बाजूस गेला. आंघोळ करुन भाऊ परत आला तेव्हा त्याला दोन्ही दार बंद दिसले. खिडकीतून बघितले तर समिक्षा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. 

आरडाओरडा करताच शेजारी गोळा झाले. त्यांनी दार तोडून घरात प्रवेश केला. शेजाऱ्यांच्या मदतीने भावाने तिला खाली उतरविले तेव्हा ती जिवंत होती. वेळ न दवडता तिला भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. 

तिच्यावर अतीदक्षता विभागात उपचार सुरु झाले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद भंडारा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून समीक्षाने क्षुल्लक कारणामुळे उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे गणेशपुरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

समीक्षा प्रेमलाल सिंधीभुरे वय ( 13 वर्ष ) असे मृत मुलीचे नाव असून ती भंडारा शहरानजिकच्या गणेशपूर येथे रहात होती.