राहुल गांधी यांना राष्ट्रीय नेता म्हटलेलं बैलांनाही आवडलेलं दिसत नाही, असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस?

बैलगाडीत मर्यादेपेक्षा अधिक जण होते. त्यामुळे ही बैलगाडी तुटली. 

Updated: Jul 11, 2021, 07:48 AM IST
राहुल गांधी यांना राष्ट्रीय नेता म्हटलेलं बैलांनाही आवडलेलं दिसत नाही, असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस? title=

नागपूर : देशात गेल्या काही दिवसांपासून इंधन दर गगनाला भिडले आहेत. वाढत्या इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने आज राज्यभरात आंदोलनं केली. या वेळेस मुंबईत आंदोलनसाठी बैलगाडी आणण्यात आली. या बैलगाडीत भाई जगताप यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळेस केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच "देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो" अशा घोषणा देण्यात आल्या. याच वेळेस बैलगाडीत मर्यादेपेक्षा अधिक जण होते. त्यामुळे ही बैलगाडी तुटली. परिणामी भाई जगतापांसह अनेक जण जमिनीवर कोसळले. यावरुन विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तोंडसुख घेतलं. तसेच त्यांनी विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली.(The bulls did not like Rahul Gandhi being called a national leader says devendra Fadnvis)

फडणवीस काय म्हणाले? 

"राहुल गांधींना राष्ट्रीय नेता म्हटल्याचं बैलांनाही आवडलं नाही. त्यामुळे ती बंडी तुटली, असं चित्र आहे. पण तरीही माझ्या त्यांच्या आंदोलनाला शुभेच्छा आहेत", अशी टोलेबाजी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते पत्रकारांशी नागपूर विमानतळावर संवाद साधत होते.  

विधानसभा अध्यक्षपदाबाबत फडणवीस काय म्हणाले? 

"महाविकास आघाडीत विधानसभा अध्यक्षपदाबाबत एकमत असतं, तर आतापर्यंत निवडणूक लावली असती. आघाडीत एकमत नसल्यानेच ते होत नाहीये", असं यावेळी फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

मंत्रिपद न मिळाल्याने प्रीतम मुंडे नाराज? 

केंद्रात अवघ्या काही दिवसांपूर्वी अनेक नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यातून 4 जणांना मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली. यामध्ये खासदार प्रीतम मुंडे यांचं नावही आघाडीवर होतं. पण अखेर त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. त्यामुळे प्रीतम मुंडे नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. या संदर्भात फडणवीस म्हणाले की, " या बाबत पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलंय.तसेच मी ही याबाबत म्हटलंय. बाकी कोणाला काय पतंगबाजी करायचीय, ती माध्यामातून होत राहिल", असा टोलाही यावेळेस फडणवीसांनी लगावला. 

"MPSC संदर्भात सरकार गंभीर नाही"

काही दिवसांपूर्वी स्वप्नील लोणकर या 2 वेळा MPSC मुख्य परीक्षा पास झालेल्या तरुणाने आत्महत्या केली. तेव्हापासून सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. सरकार MPSC संदर्भात गंभीर नाही.  स्वप्नीलच्या आत्महत्येनंतरही सरकार जागं व्हायला पाहिजे होतं, ते झालं नाही. फक्त स्टेटमेंट देऊन आपण दिलासा देऊ शकत नाही. सरकारने स्वप्नीलच्या घरच्यांना कुठलीही मदत केलेली नाही. तर दुसऱ्या बाजूला MPSC विद्यार्थ्यांना दिलासा देणारी कुठलीही गोष्ट या सरकारने केलेली नाही. 

नक्की काय घडलं?