धक्कादायक घटना, मुलाचा वाढदिवस साजरा करायाला गेले, बाप-लेकाचा बुडून मृत्यू

आपल्या आयुष्यातील आनंदाचा क्षण साजरा करताना कुटुंबावरच दु:खाचा डोंगर कोसळला.  

Updated: May 17, 2021, 03:36 PM IST
धक्कादायक घटना, मुलाचा वाढदिवस साजरा करायाला गेले, बाप-लेकाचा बुडून मृत्यू title=

नागपूर : आपल्या आयुष्यातील आनंदाचा क्षण साजरा करताना कुटुंबावरच दु:खाचा डोंगर कोसळला. आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाप-लेक आणि मुलाची आई तलावा शेजारी गेली होती. यावेळी वडील आणि 12 वर्षांचा मुलगा तलावात उतरले. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. त्यांना वाचविण्यात अपयश आल्याने दोघांना पाण्यात बुडून मृत्यू झाला.

नागपुरातल्या टिपू सुल्तान चौकात राहणाऱ्या शेख  दाम्प्त्यांचा लहान मुलाचा आज वाढदिवस होता. त्यानिमित्तान आई- वडील आणि दोन्ही लहान मुले झिल्पी तलावावर गेलेत.  यावेळी वाढदिवस साजरा करण्यास गेलेल्या बाप -लेकाचा बुडून मृत्यू  झाल्याची घटना घडली आहे. 

वडील अब्दुल शेख (35 ) आणि मोठा मुलगा शबील शेख (12) पाण्यात उतरले. तर आई ही पाण्यात उतरण्याच्या तयारीत असताना वडील आणि मुलगा दोघे बुडू लागले. मुलाच्या आईने आरडा ओरडा करत पाण्यात धाव घेत त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र दोघांना वाचवण्यात यश आले नाही. 

वडिल  आणि मुलाचा बुडून मृत्यू झाला होता.हिंगणा पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे. दरम्यान, या मुलाच्या आईला हिंगणा येथील सरकारी  रुग्णालयात दाखल केले आहे.