नाशिकमध्ये पेट्रोल पंपावर ठाणे क्राईम ब्रांचची धाड

पेट्रोल पंपामध्ये फेरफार करण्याचे लोण नाशिकमध्ये आले असून त्रिमूर्ती चौकातील एचपीच्या पेट्रोल पंपावर ठाणे क्राईम ब्रांचच्या टीम ने छापा टाकून तपासणी सुरु केलीय.  

Updated: Jul 24, 2017, 08:17 PM IST
नाशिकमध्ये पेट्रोल पंपावर ठाणे क्राईम ब्रांचची धाड title=

नाशिक : पेट्रोल पंपामध्ये फेरफार करण्याचे लोण नाशिकमध्ये आले असून त्रिमूर्ती चौकातील एचपीच्या पेट्रोल पंपावर ठाणे क्राईम ब्रांचच्या टीम ने छापा टाकून तपासणी सुरु केलीय.  

पेट्रोल पंपात चीप आढळून आली नसली तरी इलेक्ट्रोनिक बोर्ड मध्ये छेडछाड केल्याचा संशय अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जातोय. 

अधिकाऱ्यांच्या टीमने पेट्रोल पंपातील काही उपकरणे जप्त केले असून ते पुढील तपासणीसाठी पाठविले जाणर आहे. येत्या एक दोन दिवसात जिल्ह्यातील आणखी काही पेट्रोल पंपावर धाडी टाकल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.