उद्धव ठाकरे गटात भूकंप! चार तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे

बीड जिल्ह्यात शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात बंड करण्यात आले.  आर्थिक देवाण घेऊन पदे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Updated: Dec 3, 2023, 12:16 AM IST
उद्धव ठाकरे गटात भूकंप! चार तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे title=

Maharashtra Politics:  बीड जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतील चार तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. जिल्ह्यातील जिल्हाप्रमुखाच्या निवडीमध्ये 40 लाख रुपये पदाचा रेट ठरवून पदे वाटप केली आहेत.  सुषमा अंधारे पक्ष वाढवण्यापेक्षा पक्ष संपवण्यासाठी काम करत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला. शिवसेनेमधील पदाधिकाऱ्यांनी अंधारे विरोधात बंड सुरू केले आहेत.

सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप

बीडच्या परळी येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या चार तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन सामूहिक राजीनामे दिले आहेत. बीड जिल्ह्यात ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांची खांदेपालट करत नवीन तीन जिल्हाप्रमुखांची निवड करण्यात आली. यावरून नाराजी व्यक्त करत. उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. सुषमा अंधारे यांनी तीन नव्याने जिल्हाप्रमुखांची निवड केली. यानंतर आज अंधारे यांच्या परळीतील होमपीच वरून तालुकाप्रमुखांनी पत्रकार परिषद घेत आपले राजीनामे दिले आहेत. परळी व्यंकटेश शिंदे, उपजिल्हाप्रमुख अभय कुमार ठक्कर, अंबाजोगाई तालुका प्रमुख राजाभाऊ लोमटे यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

जिल्ह्यात ठाकरे सेना नाही तर अंधारे सेना करण्याचे काम सुषमा अंधारे यांच्या माध्यमातून सुरू असल्याचा आरोप शिवसेनिकांनी केला. एकाधिकारशाहीला कंटाळलो असल्याचे म्हणत पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे पक्षश्रेष्ठींना पाठवले आहेत. दरम्यान या राजीनाम्या नंतर जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. सुषमा अंधारे या मराठा द्वेशी आहेत. अनिल दादा जगताप यांनी मराठा आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल्याने त्यांच्यावर कारवाई केली. असा आरोपही तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी केला.

संजय राऊतांच्या ताफ्यात भुसे पुत्राची एण्ट्री

संजय राऊतांच्या ताफ्यात भुसे पुत्राची एण्ट्री शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या ताफ्यात पालकमंत्री दादा भुसे यांचे पुत्र आविष्कार भुसे यांनी केली दुचाकीवर एन्ट्री झाल्याने ताफ्यातील सर्वच जण अचंबित झाले. पालकमंत्री दादा भुसे यांनी राऊत यांच्याविरुध्द दाखल केलेल्या मानहानी दाव्याच्या सुनावणीसाठी राऊत मालेगावमध्ये आले होते. राऊत सोयगाव रोडने नाशिककडे परत असतांना आविष्कार भुसे दुचाकीवर येताच सर्वांचा आश्चर्याचा धक्का बसला.एवढेच नाही तर आविष्कार यांनी राऊत यांच्या ताफ्याकडे पाहून हात हलवीत व्हिक्टरी खूनही केली. प्रतिक्रिया देणार नाही, मात्र मालेगावमध्ये राऊत यांचे स्वागत आहे असे आविष्कार भुसे म्हणाले.