संजय राऊत म्हणाले, '40 आमदारांनी मोदींचा फोटो लावावा आणि जिंकून दाखवावे, जिंकल्यास राजकारण सोडेन...'

Sanjay Raut On Shinde Group : एक बाळासाहेब ठाकरे, एक लाख मोदींना भारी होते आणि आहेत. महाराष्ट्रातलं घटनाबाह्य सरकार फेकू लोकांनी आणलं, अशी टीकाही  संजय राऊत यांनी केली. मोदींचा फोटो लावून शिंदे गटाच्या 40 आमदारांनी जिंकून दाखवावं, जिंकल्यास राजकारण सोडेन, असे थेट आव्हान राऊत यांनी दिले.

Updated: May 21, 2023, 12:00 PM IST
संजय राऊत म्हणाले, '40 आमदारांनी मोदींचा फोटो लावावा आणि जिंकून दाखवावे, जिंकल्यास राजकारण सोडेन...' title=

Sanjay Raut On Shinde Group And Narendra Modi : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटातील आमदारांना आव्हान दिले आहे. तुम्ही जर मोदींचा फोटो लावून जिंकून दाखवलं तर मी राजकारण सोडून देईन, असे थेट आणि जाहीर आव्हान दिले आहे. बीड येथील महाप्रबोधन यात्रेत राऊत यांनी शिंदे सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही कडाडून टीका केली.

भाजपला 60 जागांवर ऑल आऊट करु...

एक बाळासाहेब ठाकरे, एक लाख मोदींना भारी होते आणि आहेत. महाराष्ट्रातलं घटनाबाह्य सरकार फेकू लोकांनी आणलं, अशी टीकाही राऊतांनी केली. मोदींचा फोटो लावून शिंदे गटाच्या 40 आमदारांनी जिंकून दाखवावं, जिंकल्यास राजकारण सोडेन, असे थेट आव्हान संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिले आहे. 40 लफंगे 40 चोरांना 50 - 50 कोटींचा आनंदाचा शिधा फक्त शिवसेना फोडण्यासाठी आणि महाराष्ट्र गहाण ठेवण्यासाठी दिला. तो दिल्लीच्या पायाशी घालण्यासाठी होता, अशी घनाघाती टीका  राऊत यांनी केली. सर्वसामान्यांना आनंदाचां शिदा एक किलो साखर एक किलो पाम तेल आणि त्यांना 50 - 50 हे काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

एकीकडे भाजप मुंबई महापालिकेसाठी रणनिती आखत आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला थेट इशाराच दिला आहे. एवढंच नाही तर दीडशे जागा जिंकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या भाजपला 60 जागांवरच ऑल आऊट करण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला आहे.

 'कोश्यारी यांना गुन्ह्याची फळं लवकरच मिळतील'

दरम्यान, माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना गुन्ह्याची फळं लवकरच मिळतील. 'भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राचे गुन्हेगार आहेत.  शिवसेना तोडण्यासाठी घटनेचा गैरवापर केला आहे, असा गंभीर आरोप राऊत यांनी कोश्यारी यांच्यावर केला आहे.  शिवसेना फोडण्यासाठी आणि महाराष्ट्र गहाण ठेवण्यासाठी, दिल्लीच्या पायाशी घालण्यासाठी चाळीस लफंगे यांना पन्नास कोटी दिले, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी यावेळी केला. घटनाबाह्य पद्धतीने काम करुन हे राज्य त्यांनी आणलं. त्यामुळे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना माजी राज्यपाल भेटायला गेले असतील.भगतसिंह कोश्याहरी यांना त्यांच्या कृत्याची फळ लवकरच मिळतील, असे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी पुन्हा प्रकट, पुन्हा नोट बंदी...

नोटबंदी पहिली ही फसली दुसरी ही फसली. आधीच्या नोटबंदीने किती फायदा झाला?काय झालं, भ्रष्टाचार कमी झाला का? काळा पैसा कमी झाला का? पंतप्रधान देशाशी खोटं बोललं आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा प्रकट झाले आहेत. पुन्हा नोट बंदी. 2000 हजार नोटांवर बंदी. सर्वसामान्याकडे कुणाकडेच दोन हजाराची नोट राहिली नाही अदानी आणि अडाणी तसेच भाजपचे आमदार आणि खासदार यांच्याकडेच या नोटा आहेत. मोदींचा फोटो लावून या चाळीस जणांनी निवडून यावे मी राजकारण सोडतो. आम्ही बाळासाहेबांचा फोटो लावतो तुम्ही मोदी यांचां फोटो लावून निवडून या, असे ते म्हणाले. शिवसेनेमध्ये अनेक जण प्रवेश करत आहेत. तुमचे 100 बाप खाली उतरले तर बाळासाहेबांची शिवसेना संपवाणार नाही. 'झुकेगा नही' हा शिवसेनेचा मंत्र आहे. मी गुन्हाला घाबरत नाही. मी मृत्यूला घाबरत नाही, असे राऊत म्हणाले.

प्रभु वैद्यनाथ देवाकडे एकच मागितलं. परत येईल तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेऊन येईल. सुप्रीम कोर्टाने लाथा घातल्यानंतरही नैतिकतेच्या आधारावर आतापर्यंत मिंदे सरकारने राजीनामा दिला असता. पण तसे काहीही केलेलं नाही, असे संजय राऊत म्हणाले.