शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती 240 कोटींपर्यंत, आतापर्यंत 14 जणांना अटक

TET Exam Scam : आता बातमी आहे शिक्षक भरती घोटाळ्याची. शिक्षक भरती घोटाळ्याची (Teacher recruitment scam) व्याप्ती 240 कोटींपर्यंत पोहोचली आहे. 

Updated: Mar 6, 2022, 02:20 PM IST
शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती 240 कोटींपर्यंत, आतापर्यंत 14 जणांना अटक  title=

पुणे : TET Exam Scam : आता बातमी आहे शिक्षक भरती घोटाळ्याची. शिक्षक भरती घोटाळ्याची (Teacher recruitment scam) व्याप्ती 240 कोटींपर्यंत पोहोचली आहे. परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांपासून राज्य परीक्षा परिषदेचे संचालक ही सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. (TET scam in Maharashtra has reached Rs 240 crore)

परीक्षेच्या अंतिम यादीतील निम्म्या परीक्षार्थींकडून पैसे स्वीकारुन त्यांची नावे बनावट पद्धतीने टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात आयएएस सुशील खोडवेकर याच्या अडचणीत वाढ झाली असून, त्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. या घोटाळ्यात आतापर्यंत 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

टीईटीच्या घोटाळयाची व्याप्ती 240 कोटीपर्यंत पोहोचली आहे. आयएएस सुशील खोडवेकर याचा जामीन अर्ज सत्र न्यायालयानेही फेटाळला आहे. राज्यात घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 2019च्या परीक्षेतील पेपरफुटीत गैरव्यवहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  याप्रकारणात परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांपासून राज्य परीक्षा परिषदेचे संचालक ही सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

परीक्षेच्या अंतिम यादीतील निम्म्या परीक्षार्थींकडून पैसे स्विकारुन त्यांची नावे बनावट पध्दतीने टाकण्यात आल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या परीक्षेत आर्थिक व्यवहार करण्यात आलेल्या प्रत्येक परीक्षार्थीकडून तीन ते चार लाख रुपये घेण्याचे ठरवून तब्बल  240 कोटी रुपयांपर्यंत घोटाळयाची व्याप्ती गेल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे.

याप्रकरणात अटक करण्यात आलेला भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी सुशील खोडवेकर याचा जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यापूर्वी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी ही खोडवेकर याचा जामीन अर्ज फेटाळून लावल्याने त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.